शिवसेना ठाकरेंच्या पाठीशी ः पारकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना ठाकरेंच्या पाठीशी ः पारकर
शिवसेना ठाकरेंच्या पाठीशी ः पारकर

शिवसेना ठाकरेंच्या पाठीशी ः पारकर

sakal_logo
By

31776
दोडामार्ग ः येथे घोषणा देताना शिवसेना कार्यकर्ते.

शिवसेना ठाकरेंच्या पाठीशी

संदेश पारकर ः दोडामार्ग तालुक्याचा दौरा

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २५ ः जिल्ह्यातील शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहे, अशी भूमिका शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज येथे मांडली.
शिवसेना आमदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर श्री. पारकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी येथील शिवसेना शाखेत दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पारकर म्हणाले, ‘‘शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेवर कोणताही परिणाम झालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पूर्ण ताकदीनिशी पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. शिवसेनेशी बंडखोरी करून जे कोणी आमदार गेलेले आहेत, त्यांना पुढील निवडणुकीत शिवसैनिक आणि जनता घरी बसवेल. यापुढील काळात जो कोणी शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला शिवसेना स्टाईलने शिवसैनिक उत्तर देतील. आपण आणखी जोमाने काम करून जिल्ह्यातील शिवसेना संघटना वाढवून पक्षप्रमुखांचे हात बळकट करुया.’’
यावेळी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, उपजिल्हा संघटक संजय गवस, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, तालुका समन्वयक भगवान गवस, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, उपतालुकाप्रमुख सुभाष पांगम, बाबाजी देसाई, विभागप्रमुख संतोष मोरये, हर्षल सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई, महिला उपजिल्हासंघटक विनिता घाडी, उपविभागप्रमुख मिलिंद नाईक, युवासेना शहरप्रमुख श्याम खडपकर, युवासेना उपतालुकाप्रमुख संदेश गवस, सूचन कोरगावकर, रामदास मेस्त्री, आत्माराम नाईक, विजय जाधव, ओंकार कुलकर्णी, अरुण देसाई, हेमंत कर्पे, संजय नाईक, विवेक एकावडे, ऑल्विन लोबो आदी उपस्थित होते. यावेळी जान्हवी सावंत यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71474 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top