
३४ वर्षीय तरुणावर हृदय प्रत्यारोपण
३४ वर्षीय तरुणावर हृदय प्रत्यारोपण
मुंबई : मुंबईतील ३४ वर्षीय व्यक्तीवर यशस्वी हृदय प्रत्यारोपण केले गेले. किशोर सोनावणे या रुग्णाला मागील दोन वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याला डायलेटेड कार्डियोमायोपॅथीचे निदान झाले होते. त्याचे हृदय एकूण क्षमतेच्या २० टक्के कार्य करत होते. वरिष्ठ कार्डियोलॉजिस्ट व हृदय प्रत्यारोपण सर्जन डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी हृदय प्रत्यारोपणासाठी त्याची तपासणी केली आणि त्याला हृदय प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली. ६ जून रोजी वडोदरामधून हृदयासाठी अलर्ट मिळाला आणि परळच्या ग्लोबल रुग्णालयातील पथक हृदय रिट्रायव्हलसाठी तेथे गेले. ७ जून रोजी किशोरवर यशस्वीरीत्या हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. किशोरकडे हृदय प्रत्यारोपण हाच पर्याय होता. त्यामुळे त्याच्यावर हृदय प्रत्यारोपण केले गेले, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71514 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..