राजापूर-राजापुरातील धबधब्यांची पर्यटकांना भूरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरातील धबधब्यांची पर्यटकांना भूरळ
राजापूर-राजापुरातील धबधब्यांची पर्यटकांना भूरळ

राजापूर-राजापुरातील धबधब्यांची पर्यटकांना भूरळ

sakal_logo
By

1) rat26p4.jpg
31868
- राजापूर ः जितवणे धबधबा.
...
फोटो मोठा लावावा
2) rat26p5.jpg
L31869
-राजापूर ः चुनाकोळवणचा धबधबा.
...
3) rat26p6.jpg
L31870
-राजापूर ः धोपेश्वर मंदिराच्या येथील धबधबा.
--------------
चला, जलप्रपात झेलूया, धबधबे अनुभवूया!

राजापुरातील धबधब्यांची पर्यटकांना भुरळ; पर्यटकांच्या आनंदाला भरते

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ : कोकणाला निसर्गदत्त लाभलेल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ घातली आहे. या निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात काही तास रिझविलेल्या काही क्षणांचा आनंद काही औरच असतो. पर्यटकांच्या नजरा आणि मने खिळवून ठेवणाऱ्‍या या नैसर्गिक सौंदर्याच्या खजिन्यामध्ये अवखळपणे, उंचावरून पडणाऱ्‍या धबधब्यांचा समावेश होतो. मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहून लागले आहेत. धबधब्याच्या माध्यमातून निसर्गातील ओघळणारे हे मोती हिरवेगार झालेले निसर्गसौंदर्य अधिकच खुलवित आहे.
गेली दोन दिवस पावसाने जोर धरला आहे. त्यामध्ये निसर्गानेही कात टाकली आहे. डोंगरदऱ्‍या हिरव्यागार दिसू लागल्या आहेत. झरे, ओहोळ, नद्या प्रवाहित झाल्या आहेत. फेसाळणाऱ्‍या पाण्याने उंचावून सतत शुभ्र जलधारांनी कोसळणारे धबधबे, त्याच्या जोडीला हिरवागार निसर्ग, डवरलेल्या वृक्षवेली मनामध्ये उल्हास अन् आनंद निर्माण करत आहेत. या धबधब्याखाली बसून मनसोक्तपणे आंघोळीचा आनंद लुटणे पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
...
चौकट
सवतकडा, परिटकडा, कातळकडा..
पर्यटकांच्या मनपसंतीला उतरणाऱ्‍या तालुक्यातील धबधब्यांमध्ये मृडानी नदीवरील धोपेश्‍वर येथील धबधबा, चुनाकोळवण येथील सवतकडा आणि परिटकडा, हर्डी येथील कातळकडा, ओझरचा धबधबा, कोंढेतड येथील मुंबई-गोवा महामार्गावरील धबधब्यांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71603 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top