कोकण बोर्डाच्या यंत्रणेला आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण बोर्डाच्या यंत्रणेला आवाहन
कोकण बोर्डाच्या यंत्रणेला आवाहन

कोकण बोर्डाच्या यंत्रणेला आवाहन

sakal_logo
By

कोकण बोर्डाच्या
यंत्रणेला आवाहन
कुडाळ ः सध्या दहावी, बारावी निकालाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी पेपरपूर्व मूल्यांकन, मायग्रेशन सर्टिफिकेट, विषय बदल, गुणपत्रकातील चूक अशा विविध कारणांसाठी कोकण बोर्डाकडे अर्ज करतात. या कामासाठी बोर्डात कधी यायचे, कागदपत्रे कधी मिळणार यासाठी कोकण बोर्डाच्या लॅंडलाईनवरून संपर्क करतात; पण बोर्डाचे दोन्ही फोन बंद अथवा नादुरुस्त लागत असल्याने याचा फटका विद्यार्थी व पालकांना बसत आहे. फोन लागत नसल्याने रत्नागिरीत निष्कारण फेऱ्या माराव्या लागत आहेत. फोन नादुरुस्त असतील तर बोर्ड अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन नंबर प्रसिद्ध करावेत. त्यामुळे बोर्डात घालावे लागणारे हेलपाटे वाचतील, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
..............
मोचेमाडला
शालेय साहित्य
वेंगुर्ले ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मोचेमाड शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम नुकताच सामाजिक कार्यकर्ते राजन तावडे व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजन तावडे, सरपंच स्वप्नेशा पालव, उपसरपंच श्रीकांत घाटे, अणसूर उपसरपंच संजय गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास चोपडेकर,उमेश पालव, यशश्री कुबल, दाजी कुबल, संतोष चोपडेकर, बाबी गावडे, समीर पडते, विलास पडते, सीताराम गावडे, निधी आरावंदेकर, साक्षी गावडे, पंच सदस्य चैताली पालव आदी उपस्थित होते. सुरेंद्र वारंग यांनी स्वागत केले. तानाजी शिंगाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद विर्नोडकर यांनी आभार मानले.
--
मत्स्य व्यवसाय
प्रशिक्षण १ पासून
मालवण ः मत्स्य व्यवसाय विभागामार्फत आयोजित सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिन देखभाल व परिचलन प्रशिक्षणाचे ८० वे सत्र १ जुलैपासून प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय केंद्र, सिंधुदुर्ग मालवण येथे सुरू होणार आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विहित नमुन्यातील अर्ज ३० जूनपर्यंत कार्यालयाच्या वेळेत कामकाजाच्या दिवशी नमूद केलेल्या कार्यालयास सादर करावेत. अधिक माहितीसाठी प्र. के. सुर्वे, अ. ग. बौधले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
--------
शिरोडा येथे
‘प्रवेशोत्सव’
वेंगुर्ले ः शिरोडा येथील सेंट्रल बालकांच्या प्रायमरी स्कूल या मराठी शाळेत पहिलीमध्ये दाखल शाळापूर्व तयारी अभियान मेळावा व शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम झाला. दरम्यान, प्रारंभी या बालकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेत स्वागत केल्यावर मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, माजी सभापती प्रीतेश राऊळ, लक्ष्मीकांत कर्पे, श्री. टिळवे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच राहुल पडवळ, कांती तारी, नामदेव गावडे, अस्मिता सावंत, शर्वरी कांबळी, फ्रान्सिस फर्नांडिस, संतान फर्नांडिस आदी उपस्थित होते. प्रेमदास राठोड यांनी सूत्रसंचालन केले.
-------------
रेल्वे गाडीला
जादा स्लिपर बोगी
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जामनगर-तिरुनवेली (१९५७७) या प्रवासी रेल्वेला तात्पुरत्या स्वरुपात जादा बोगी जोडण्यात येत आहे. ही बोगी स्लिपर स्वरुपाची आहे. त्यानुसार ११२७ व २८ जूनची ही गाडी एक जादा बोगीसह धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली. या गाडीला दक्षिण कोकणात रत्नागिरी स्थानकामध्ये थांबा आहे.
----------------
‘वैश्य समाज''तर्फे
गुणवंतांना आवाहन
कणकवली ः वैश्यगुरू वामनाश्रम स्वामींचा १९ वा चातुर्मास सुरू असून, तो १० सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. यानिमित्त वैश्य समाजातील दहावी, बारावीतील ६० टक्केहून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी तसेच पदवी शिक्षणानंतर विशेष शिक्षण घेऊन प्रगती केलेल्या विद्यार्थ्यांचा वैश्य समाज, कणकवलीतर्फे गौरव करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका, फोटो पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71606 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..