
खामशेतमध्ये गटशेतीतून हळद लागवड
rat26p9.jpg-
31885
खामशेत (ता. गुहागर) ः हळद लागवड करणाऱ्या महिला.
-----------
खामशेतमध्ये गटशेतीतून
सुधारित पद्धतीने हळद लागवड
पावस, ता. 26 ः गुहागर तालुक्यातील खामशेत येथील महिलांनी गटशेतीतून सुधारित पद्धतीने हळद लागवड केली आहे. कृषी विभागाच्या कृषी संजीवनी कार्यक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला
आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिला कृषी क्षेत्रातही पुढाकार घेऊन नवनवीन उपक्रम राबवत आहेत. कोकणातील शेतीमध्ये ७० टक्के वाटा असलेल्या महिला या बचत गटामार्फत शेतीशी गटाने जोडत्या जात आहेत. यातूनच गटशेतीची संकल्पना कोकणामध्ये उदयास येत आहे. त्याचेच एक उदाहरण खामशेत गावात पाहायला मिळाले. येथील महिला बचत गटाने एकत्र येऊन सुधारित पद्धतीने भात व हळद या पिकांची लागवड करण्याचा उपक्रम राबवला. ''एकीचे बळ'' या म्हणीप्रमाणे त्यांनी हाती घेतलेल्या सुधारित शेतीचा मंत्र यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यापुढेही त्या गटशेती वाढवणार आहेत. शेतक्षेत्रात प्रगतीचे पाऊन पुढे टाकण्यासाठी कृषी विभागाने गावात शेतीशाळा हा उपक्रम सुरू केला असून गावातील कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71618 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..