
चिपळूण-चिपळुणात गतवर्षीच्या तुलनेत 25 टक्केच पाऊस
पाउस चित्र वापरा
...........
चिपळुणात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच पाऊस
पावसाला सुरवात झाल्याने शेतकरी वर्ग आता सुखावला
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : गेल्या वर्षी १ ते २५ जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी एक हजार मिलिमीटर पाऊस झाला होता. तो यावर्षी याच कालावधीत २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. गेले दोन दिवस रिमझिम पाऊस कोसळत असून शेतकरी राजाही सुखावला आहे.
जून महिना संपत आला तरी जिल्ह्यामध्ये मॉन्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. या शिवाय भात लावणीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. पाऊस लांबल्याने सुरवातीला केलेली भात पेरणी अडचणीत येते की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या सुदैवाने गेले दोन दिवस पावसाने सुरवात केली. त्यामुळे भात बियाणे रुजले. परंतु त्यानंतर शेतीची पुढील कामे पावसाअभावी खोळंबली आहेत.
आतापर्यंत सरासरी २९९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, गेल्यावर्षी २५ जूनपर्यंत १०२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे २५ टक्क्याहून कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. याचा परिणाम भातपिकावर होणार आहे. भात लावणीची कामे पंधरा ते वीस दिवस पुढे जाणार आहेत. १ ते २५ जूनपर्यंत या कालावधीत सर्वांत जास्त लांजामध्ये ४०९ मिलिमीटर, रत्नागिरीमध्ये २७१, गुहागरमध्ये २५५, संगमेश्वरमध्ये २५४, राजापूरमध्ये २०२, दापोलीत १९९, खेड १३४, चिपळूण १२८ तर मंडणगडमध्ये सर्वांत कमी १२० मिलिमीटर पाऊस झाला आहे. याच कालावधीत गेल्यावर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये सरासरी १०२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे आगामी काळात पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांची कामे खोळंबणार आहेत. याचा परिणाम भातपिकावर होणार असून लावणीची कामे रखडणार आहेत.
...
एक नजर..
१ ते २५ जून कालावधीतील पाऊस (मिलिमीटर)
सर्वांत जास्त लांजामध्येः ४०९
रत्नागिरीमध्येः २७१
गुहागरमध्येः २५५
संगमेश्वरमध्येः २५४
राजापूरमध्येः २०२
दापोलीतः १९९
खेडः १३४
चिपळूणः १२८
मंडणगडमध्ये सर्वांत कमीः १२०
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71619 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..