चिपळूण - तरूणाईला पावसाळी पर्यटनाचे वेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - तरूणाईला पावसाळी पर्यटनाचे वेध
चिपळूण - तरूणाईला पावसाळी पर्यटनाचे वेध

चिपळूण - तरूणाईला पावसाळी पर्यटनाचे वेध

sakal_logo
By

-rat26p8.jpg
31884
-चिपळूण ः शहरापासून जवळ असलेला सवतसडा धबधबा कोसळण्यास सुरवात झाली आहे.
--------------
पावसाळी पर्यटनाचे तरुणाईला वेध

‘सवतसडा’ कोसळू लागला; धबधब्यांसह घाटातील पर्यटनस्थळांना पसंती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः कोरोनामुळे निसर्गप्रेमींना वर्षा सहलीचा आनंद घेता आला नव्हता. त्यामुळे यावर्षी पाऊस सुरू होताच तरुणाईला सहलींचे वेध लागले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून एक दिवसाच्या सहलीसाठी तयारी सुरू झाली आहे. चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यातील पर्यटनस्थळांना विशेष पसंती मिळत आहे. पावसाने दमदार सुरवात केली आहे. त्यामुळे चिपळूण, गुहागर, खेड तालुक्यातील डोंगराळ भागातून वाहणारे धबधबे सुरू झाले आहेत.
चिपळूणमधील सवतसडा धबधबा, धरण परिसरात सुरू झालेले धबधबे, रघुवीर घाटामधील धबधबे, तेथील निसर्ग, कुंभार्ली घाटातील निसर्ग तेथे रस्त्यावरून वाहणारे लहान-मोठे धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहे. गुहागरमधील समुद्रकिनारा पावसाळ्यात धोकादायक असला तरी ग्रामीण भागातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पावसाळी पर्यटकांची पावले या परिसराकडे वळणार आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी सुटीचे दिवस आणि खास करून शनिवार-रविवार ही स्थळे पर्यटकांनी फुलून जाणार आहेत.
------------
चौकट
नागरिकांनी ही खबरदारी व काळजी घ्यावीः
*अतिवृष्टीत पावसाच्या पूर्व अंदाजाची माहिती घेऊनच बाहेर पडा
*अतिउत्साहीपणाने दुर्घटनेला आमंत्रण; यापासून दूर राहावे.
*माहिती नसलेल्या, धोकादायक मार्गाच्या ठिकाणी जाणे टाळा
*आपत्कालात स्थानिक पोलिस वा सामाजिक संस्थांशी संपर्क साधा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71621 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..