टुडे पान दोन मेन-सहानुभूतीसाठी बंडाचे खापर ''राष्ट्रवादी''वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे पान दोन मेन-सहानुभूतीसाठी बंडाचे खापर ''राष्ट्रवादी''वर
टुडे पान दोन मेन-सहानुभूतीसाठी बंडाचे खापर ''राष्ट्रवादी''वर

टुडे पान दोन मेन-सहानुभूतीसाठी बंडाचे खापर ''राष्ट्रवादी''वर

sakal_logo
By

टीपः swt२६९.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - अर्चना घारे-परब
सहानुभूतीसाठी बंडाचे खापर ''राष्ट्रवादी''वर
अर्चना घारे ः नेत्यांवरील टिकेबाबत केसरकरांना प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी बंडाचे खापर राष्ट्रवादीवर फोडत आहेत. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी आमच्या नेत्यांवर टीका करून सत्य लपवित आहेत. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आहेत. आमच्या नेत्यांवर विनाकारण टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा कोकण विभाग राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्षा अर्चना घारे यांनी दिला आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून बोलत असताना आमदार केसरकर आपली बाजू मांडत आहेत. त्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे; मात्र आपली बाजू मांडत असताना ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नेत्यांवर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला. त्याचा तपशील आम्ही लवकरच पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्गातील जनतेसमोर मांडू. उपमुख्यमंत्री पवार यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांसाठी ''सिंधुरत्न'' योजना सुरू केली. ३०० कोटीचा निधी या योजनेतून दोन जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. सिंधुरत्न योजनेचे अध्यक्षपद देखील त्यांनी दीपक केसरकर यांना दिले. रत्नागिरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार असताना हे पद ते त्यांना देऊ शकले असते; मात्र तसे न करता हे पद आमदार केसरकरांना देण्यात आल. निधी वाटपातही कोकणावर कोणताही अन्याय केलेला नाही. भूतकाळ विसरून त्यांनी केसरकरांना भरघोस निधी दिला. त्यामुळे निधीवरून केसरकर करत असलेली टीका योग्य नाही. मल्टिस्पेशालिटीबाबत देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला. निधीची उपलब्धता देखील केली; परंतु जागेच्या प्रश्नामुळे हे हॉस्पिटल रखडले. हा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून केसरकरांची होती; मात्र हा प्रश्न अद्याप रखडला असून, आमदार केसरकर करत असलेल्या टिकेमध्ये तथ्य नाही. शिंदे गटाने केलेल्या बंडाचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर फोडण्याचे काम ते करत आहेत.
.............
आघाडी धर्म पाळू
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यावर केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी आणि स्वतःचा नाकर्तेपणा लापविण्यासाठी टीका करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून, महाविकास आघाडीचा धर्म आम्ही शेवटपर्यंत पाळू. आमदार केसरकरांनी आमच्या नेत्यांवर टीका करणे बंद करावे; अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा कोकण विभाग राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस अध्यक्षा अर्चना घारे यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71643 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..