
रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्षपदी अॅड. शाल्मली आंबुलकर
rat२६p१.jpg-
३१८६५
रत्नागिरी : रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्ष अॅड. शाल्मली आंबुलकर यांना मानाची रोटरी पिन देताना शरद पै.
------------------
रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्षपदी अॅड. शाल्मली आंबुलकर
१ जुलैपासून रोटरीचे नवे वर्ष; कोकण विभाग असिस्टंट गव्हर्नरपदी नीलेश मुळ्ये
रत्नागिरी, ता. २६ : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी वकिल शाल्मली विनय आंबुलकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ अंबर हॉल येथे झाला. पदग्रहण अधिकारी म्हणून डिस्ट्रीक्ट गव्हर्नर शरद पै यांनी काम पाहिले. येत्या १ जुलैपासून रोटरी इंटरनॅशलनचे नवीन रोटरी वर्ष सुरू होत आहे.
रोटरी इंटरनॅशनलच्या इतिहासात पहिल्यांदाच ११७ वर्षानंतर एका महिला रोटरी सदस्याकडे रोटरी इंटरनॅशनल अध्यक्षपदाची धुरा आली. या रोटरी वर्षाकरीता कॅनडाच्या जेनीफर जोन्स या रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष म्हणून रहाणार असून, त्या अंतर्गत रोटरी डिस्ट्रीक्ट ३१७० चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर म्हणून बेळगाव येथील व्यंकटेश उर्फ बबन देशपांडे हे पदभार स्वीकारत आहेत. कोकण विभागाकरीता असिस्टंट गव्हर्नर म्हणून नीलेश मुळ्ये काम पाहणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन ही समाजोपयोगी क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, माता-बाल संगोपन, पाणी व्यवस्थापन अशा विविध स्तरांवर अग्रेसर असणारी संस्था रत्नागिरी परीसरामध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या अध्यक्षा म्हणून अॅड. शाल्मली आंबुलकर यांनी पदभार स्वीकारला. सेक्रेटरी म्हणून बिपीनचंद्र गांधी, खजिनदार वामन सावंत या वर्षाकरीता काम पाहणार आहेत. क्लबचे पदाधिकारी म्हणून क्लब सर्व्हिस संचालक समीर इंदूलकर, कम्युनिटी सर्व्हिस संचालक डॉ. केतनकुमार चौधरी, व्होकेशनल सर्व्हिस संचालक दिगंबर मगदूम, इंटरनॅशनल सर्व्हिस संचालक अॅड. विनय आंबुलकर, युथ सर्व्हिस संचालक संजय पतंगे यांची निवड करण्यात आली.
चौकट
व्हिलचेअर प्रदान
क्लबच्या रत्नांकुर या अंकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. कापडगांव येथील अपंग व्यक्ती श्री. कोत्रे यांना, रोटरीतर्फे व्हीलचेअर प्रदान केली. गणपतीपुळे समुद्रामध्ये बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यास मदत करणाऱ्या मोरया स्पोर्टस या संस्थेला गौरवले. यूपीएससी परीक्षेमध्ये रॅकींगमध्ये आलेल्या चेतन पंदेरे, कवियत्री सौ. वृषाली टाकळे यांचा सन्मान केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71683 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..