गोळपमधील ५०० कुटुंबांना बियाणे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोळपमधील ५०० कुटुंबांना बियाणे वाटप
गोळपमधील ५०० कुटुंबांना बियाणे वाटप

गोळपमधील ५०० कुटुंबांना बियाणे वाटप

sakal_logo
By

rat२६p१६.jpg
३१९१२
गोळप : गावातील महिलेला भाजीपाल्याचे बियाणे देताना सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे.
-----------
गोळपमधील ५०० कुटुंबांना बियाणे वाटप
पावस, ता. २६ : गोळप येथील ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यंदा गावातील व परिसरातील ५०० कुटुंबांना भाजीपाला बियाण्यांचे वाटप केले आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आपापल्या गावात बियाण्यांचे वाटप करण्याचे आवाहन अविनाश काळे यांनी केले आहे.
काळे यांच्याकडे समाजासाठी अनेक अभिनव कल्पना असतात. त्यातलीच एक वेगळी कल्पना गेल्यावर्षी राबवली. गेल्यावर्षी त्यांनी गोळप ग्रामपंचायत प्रभागामध्ये जवळपास २६० कुटुंबांना दहा प्रकारच्या भाजीपाला बियाण्याचे वाटप केले होते. यातून त्यांना घरी पुरेल एवढी भाजी उपलब्ध होईल असा उद्देश होता. गावात वानर, माकडांचा त्रास आहे. परंतु त्यांनी थोडे खाल्ले तरीही कुटुंबाकरिता भाजी मिळेल. गेल्या वर्षीच्या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळाला. भाजी पिकवून खाल्याचे अनेक नागरिकांनी आवर्जुन सांगितले.
गेल्यावर्षी पोस्ट वाचून अनेक जिल्ह्यामधून त्याचबरोबर गोवा, केरळमधूनही सुंदर उपक्रमाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आणि असा उपक्रम आमच्याकडेही राबवू सांगण्यासाठी अनेक फोन, मेसेज आले होते, असे अविनाश काळे यांनी सांगितले. यामुळे उत्साह वाढून यावर्षी पुन्हा एकदा भेंडी, घेवडा, गवार, मुळा, चवळी, काकडी, मिरची, पालक, दोडका दहा प्रकारची बियाणी जमवून छोट्या छोट्या पाकिटात भरून गोळप प्रभागासहित गावात वाड्यांमध्ये जवळजवळ ५०० पेक्षा जास्त कुटुंबांना मोफत भाजीपाला बियाणे प्रत्येकाच्या घरी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71684 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top