विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न - सुहास राजेशिर्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न - सुहास राजेशिर्के
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न - सुहास राजेशिर्के

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न - सुहास राजेशिर्के

sakal_logo
By

ratchl261.jpg
31935
चिपळूणः गुणगौरव सोहळ्यास उपस्थित मान्यवरांसमवेत गुणवंत विद्यार्थी.
--------------
विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न
सुहास राजेशिर्के ; अडरे पंचक्रोशीतील गुणवंताचा गौरव
चिपळूण, ता. २६ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना खरी मदतीची गरज असते. माझी मातृभूमी असलेल्या या अडरे-वेहेळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे, असे प्रतिपादन सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी येथे केले.
माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, वेहेळे ग्रामपंचायतीचे सदस्य रोहित गमरे, सामाजिक कार्यकर्ते उदय भोजने, भिम संघर्ष क्रीडा मंडळ वेहेळे यांच्या वतीने अडरे येथील पी. के. सावंत माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्याध्यापिका सुषमा इंदुलकर यांनी आपल्या विद्यालयाने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. आपण बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत असताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले सुयश हे निश्चितच सर्वांना समाधान देणारे असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे शाळेसमोरील वेगवेगळ्या शैक्षणिक समस्या सांगून ते सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. दहावीतील गुणवंत विद्यार्थी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संदेश पवार, दत्ताराम निर्मळ, जयप्रकाश खेडेकर, देविदास शिंदे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71685 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top