केसरकरांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा प्रयत्न दुर्दैवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसरकरांच्या कार्यालयावरील
हल्ल्याचा प्रयत्न दुर्दैवी
केसरकरांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा प्रयत्न दुर्दैवी

केसरकरांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा प्रयत्न दुर्दैवी

sakal_logo
By

L3194

मंगेश तळवणेकर

केसरकरांच्या कार्यालयावरील
हल्ल्याचा प्रयत्न दुर्दैवी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः शांत, संयमी, अभ्यासू व गोरगरिबांचा नेता असलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर जो हल्ल्यांचा प्रयत्न केला गेला, तो पोलिसांच्या कर्तव्यदक्षपणामुळे नाकाम करण्यात आला. हा प्रकार चुकीचा व दुर्दैवी आहे, असे मत माजी शिक्षण आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी व्यक्त केले.
श्री. तळवणेकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सावंतवाडी मतदार संघ हा शांतताप्रिय मतदारसंघ आहे. त्यामुळे आपला रोष अशा पद्धतीने व्यक्त न करता माध्यमातून व्यक्त करणे गरजेचे होते. आमदार केसरकरांची ओळख शांत, संयमी व्यक्तिमत्त्व अशी आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही वाईट बोलत नाहीत. भाई सावंत यांच्यानंतर विधानसभेत अभ्यासू भाषण करणारा केसरकरांसारखा दुसरा नेता नाही. त्यांच्यासोबत कोणी नाही, असे कोणीही समजून नये. आजही त्यांना मानणारा समाजातील एक मोठा वर्ग आहे. त्यांना जर कोणताही त्रास झाला, तरीही लोक मतपेटीतून त्याला उत्तर देतात. सद्यस्थितीत मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही; मात्र सावंतवाडीची संस्कृती वेगळीच आहे. ती तशीच रहायला हवी. शांततेत मोर्चा, रॅली काढणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे; परंतु त्याला कुठलेही गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी व जिल्ह्यात शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71691 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..