चिपळूण - शेतीची मशागतीची कामे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - शेतीची मशागतीची कामे सुरू
चिपळूण - शेतीची मशागतीची कामे सुरू

चिपळूण - शेतीची मशागतीची कामे सुरू

sakal_logo
By

-rat२६p२४.jpg
L31946
- चिपळूण ः तालुक्यातील पेढांबे येथे भात लावणीपूर्वी शेताची उखळ सुरू आहे.
-----------
पावसाच्या हजेरीने सुरू झाली लावणीची तयारी

चिपळुणात शेतीच्या मशागतीची कामे सुरू; बळीराजा खूश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार सुरवात केली आहे. त्यामुळे भातासह ज्वारी, बाजरी, नागली पिकांसाठी आवश्यक मशागती सुरू झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर भात लावणीला पुढील काही दिवसांत सुरवात होईल.
चिपळूणच्या ग्रामीण व शहरी भागात अजूनही शेती केली जात आहे. शेकडो हेक्टरमध्ये येथे भात व इतर पिके घेतली जात आहे. भातासह इतर पिकांसाठी येथील जमीन उपयुक्त ठरते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील खत विक्रेत्यांकडे खते खरेदीकरिता गर्दी सुरू आहे.
येथील भात बियाण्यांचे विक्रेते राजा दळी म्हणाले, शेतकऱ्यांकडून मे महिन्यात भात खरेदी सुरू झाली. इंद्रायणी, सुवर्णा, डांगी, कसबय, सोनम, राशीपुनम, पाच ऐकी, मुंद्रायणी, सह्याद्री ६८९, कर्जत ४ ते १२, हळवा भात बियाण्यांची खरेदी झाली. त्यात मसुरा, कसबय, कर्जत ४, सुमा, एक काडी, कोलम या भात बियाणा जास्त मागणी होती. हळवा भात म्हणजे लवकर पिकणारा भात आहे, हे पीक ९० ते ११० दिवसांत पिकतो आणि गरवा भाताला १२० ते १२५ दिवसांत पिकतो. त्यामुळे हळवा भात बियाण्याला चांगलीच मागणी आहे. हळवे भात बियाणे प्रतिकिलो ९० ते १८० रुपयांपर्यंत, तर गरवे भात बियाणे २५ किलो पोती १०० ते २०५ रुपये या दराने बाजारात विकण्यात आले. शेतकऱ्यांकडून शंभर टक्के भातपेरणी पूर्ण झाली आहे.
..
चौकट
उखळ करून शेताची मशागत
यंदाचा पाऊस १८ जूनपासून सुरू झाला. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. आता पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. शेतकरी नांगर, बैल घेवून शेतावर जात आहेत. पावसाळ्यापूर्वीची उखळ करून शेताची मशागत केली जात आहे. शेतात उगवलेले गवत काढून टाकले जात आहे. शेतात जास्त पाणी साचणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील काही दिवसांत भात लावणीला प्रारंभ होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71707 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top