
राजापूर येथे घरावर झाड कोसळून तिघे जखमी
rat२६p२२.jpg-
३१९३९
राजापूरः पळसमकरवाडी येथे घरावर पडलेले झाड.
-rat२६p२३.jpg
३१९४०
राजापूरः मुन्शी नाका येथे कोसळलेली संरक्षक भिंत.
-----------
घरावर झाड कोसळून तिघे जखमी
राजापुरात संततधार कायम ; संरक्षक भिंत कोसळून नुकसान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. सातत्याने पडणार्या पावसामध्ये शहरातून वाहणार्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. पळसमकरवाडी येथे घरावर झाड कोसळून घराचे नुकसान झाले असून तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. शहरामध्ये मुन्शीनाका परिसरातील संरक्षण भिंतही कोसळून नुकसान झाले आहे.
सातत्याने सरींवर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांना सलग तिसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. शनिवारी (ता. २५) दिवसभरामध्ये तालुक्यात १३१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. तालुक्यातील पळसमकरवाडी येथे शांताराम पळसमकर यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. घराच्या नुकसानीसह शांताराम पळसमकर, राजय पळसमकर, सविता पळसमकर असे तिघेजण किरकोळ जखमी झाले. पावसामुळे मुन्शी नाका परिसरातील संरक्षक भिंत कोसळली. या संरक्षक भिंतीसाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना विशेष अनुदान निधीतून सुमारे पाच लाख अंदाजित रक्कम मंजूर होती. त्यातून ही संरक्षक भिंत बांधण्यात आली होती.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71713 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..