आमदार नाईकांचे मालवणात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार नाईकांचे मालवणात स्वागत
आमदार नाईकांचे मालवणात स्वागत

आमदार नाईकांचे मालवणात स्वागत

sakal_logo
By

31944
मालवण ः आमदार वैभव नाईक यांचे स्वागत करताना शिवसैनिक.


आमदार नाईकांचे मालवणात स्वागत

शिवसैनिकांकडून घोषणाबाजी; रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ ः ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ आदी गगनभेदी घोषणा देत शहरात शिवसैनिकांनी प्रचंड उत्साहात आमदार वैभव नाईक यांचे स्वागत केले. भरड नाका येथून शिवसेना शाखेपर्यंत यावेळी रॅली काढण्यात आली. शहरात आज प्रचंड पाऊस असतानाही आमदार नाईकांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
शिवसेना नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड करत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. राज्यातील सत्तानाट्यात शिवसेनेचे अनेक मंत्री देखील एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले असताना आमदार नाईक मात्र शिवसेनेशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. या पार्श्वभूमीवर काल कुडाळमध्ये शिवसेनेच्यावतीने आमदार नाईक यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर आज ते मालवणात दाखल होताच ढोलताशांच्या गजरात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
भरड नाक्यावर आयोजित या स्वागत सोहळ्याला शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, पंकज सादये, नरेश हुले, आकांक्षा शिरपुटे, शीला गिरकर, गणेश कुडाळकर, भाई कासवकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, शहर प्रमुख मंदार ओरसकर, अमेय देसाई, महिला उपसंघटक सेजल परब, महिला समन्वयक पूनम चव्हाण, शिल्पा खोत, सुनीता जाधव, प्रवीण लुडबे, आतु फर्नांडिस, नीनाक्षी शिंदे, सन्मेष परब, बाबा सावंत, किरण वाळके, गौरव वेर्लेकर, बाळू नाटेकर, उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, दीपक देसाई, भगवान लुडबे, सुहास वालावलकर, नंदा सारंग, अंजना सामंत, पुजा तळाशीलकर, प्रसाद आडवणकर, अक्षय भोसले, अक्षय सातार्डेकर, सुरेश मडये, दत्ता पोईपकर, बंड्या सरमळकर, स्वप्निल आचरेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71730 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..