चिपळूण-अनंत गीते अॅक्शन मोडमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-अनंत गीते अॅक्शन मोडमध्ये
चिपळूण-अनंत गीते अॅक्शन मोडमध्ये

चिपळूण-अनंत गीते अॅक्शन मोडमध्ये

sakal_logo
By

31989 ः अनंत गीते
....
अनंत गीते अॅक्शन मोडमध्ये

मतदारसंघात बैठका; कार्यकर्त्यांना पक्षाबरोबरच राहण्याचा सल्ला, राजकारण ढवळणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः शिवसेना नेते अनंत गीते शिवसेनेच्या अडचणीच्या काळात पक्षासाठी धाऊन आले आहेत. शनिवारी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला न जाता गीते लोटे (ता. खेड) येथे आले. उत्तर रत्नागिरी भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. कार्यकर्त्यांची मते आजमावून घेत त्यांना पक्षाबरोबरच राहण्याचा सल्ला दिला. गीते अॅक्शन मोडवर आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही आनंद आहे. पक्षातील विरोधकांनी बंडखोरी केल्यामुळे आता पुढचे मैदान गीते यांच्यासाठी मोकळे आहे.
अनंत गीते यांचा मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यातच त्यांचा मुंबईतील शिवसेना भवन आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरेचे निवासस्थान असलेल्या मातोश्री शीदेखील संपर्क तुटलेला होता. मध्यंतरी श्रीवर्धन येथील मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्याने त्यांना सभा, मेळावे बैठकांपासून ते अगदी नुकत्याच राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानातही दूर ठेवण्यात आले होते. त्यांनी रायगड, रत्नागिरी येथील राजकीय कार्यक्रम टाळले होते. ते सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमाला आले तरी राजकीय विषय टाळून बोलत होते.
कोकणातील गीते हे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. रत्नागिरी आणि रायगड अशा दोन्ही मतदारसंघातून सहावेळा लोकसभेला निवडून गेलेले आहेत. मात्र, मागील लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर ते काहीसे अलिप्त राहिले. शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत यासंदर्भात गेले पाच दिवस बैठकांचे सत्र सुरू असतानाही गीते मात्र यापासून दूर होते.
..
चौकट
शनिवारच्या बैठकीकडे पाठ
अनंत गीतेंच्या मतदारसंघातील महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, खेडचे योगेश कदम हे बंडखोर गटात सहभागी झाले आहेत. गीते राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य असूनही शनिवारच्या बैठकीकडे पाठ फिरवत, त्यांनी रायगड लोकसभा मतदार संघात बैठकांचा सपाटा लावला.
-----------------------------
चौकट
वातावरण अधिक तापणार...
पक्षातील विरोधकानी बंडखोरी केल्यामुळे आता पुढचे मैदान आपल्यासाठी मोकळे आहे. हे गीतेंच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. गीते सक्रीय झाल्यामुळे रायगडबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेंतर्गत राजकारण पुन्हा ढवळणार आहे. त्यातच बंडखोर आमदार भविष्यात कोणत्याही पक्षाकडून उभे राहिल्यास त्यांना निवडणुकीत जागा दाखवणार, असा इशाराही दिल्याने वातावरण अधिक तापणार आहे.
............
कोट
मी रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या समर्थनासाठी बैठका घेतल्या. त्यांची मते जाणून घेतली. कार्यकर्ते आणि मतदार पक्षाबरोबर आहेत. माझ्या मतदार संघात शिवसेनेसाठी वातावरण चांगले आहे. जे बंडखोरी करतील, त्यांना कार्यकर्ते त्यांची जागा दाखवतील.
-अनंत गीते माजी खासदार तथा शिवसेना नेते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71740 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..