पावस-सव्वासहा लाखाची हानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-सव्वासहा लाखाची हानी
पावस-सव्वासहा लाखाची हानी

पावस-सव्वासहा लाखाची हानी

sakal_logo
By

पूर्णगड-बौद्धवाडीतील घराचे
सव्वासहा लाखाची हानी
पावस, ता.२६ ः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड-बौद्धवाडी येथे मुसळधार पावसामध्ये संरक्षक भिंत पडून विलास पवार यांच्या घराचे सुमारे सव्वासहा लाखाचे नुकसान झाले आहे. २५ जूनला रात्रभर पडलेल्या पावसामुळे सकाळी सव्वापाच वाजता ५५ फूट उंचीची चिरेबंदी संरक्षक भिंत विलास पवार यांच्या घरावर पडली होती. घरामध्ये दोघेच होते. परंतु सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. गावचे पोलिसपाटील संतोष पाथरे, ग्रामस्थ, तलाठी व सरपंच यांच्या उपस्थितीत घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. घराच्या नुकसानाचा पंचनामा करण्यात आला. घराचे सुमारे सव्वासहा लाखाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले. सध्या पावसाळा सुरू असल्याने व घराची दयनीय अवस्था झाल्याने पवार कुटुंबीयांनी शेजारच्या घरात आश्रय घेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71741 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top