रत्नागिरी-लाकडाच्या गिरणीचा मालक अपघातात ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-लाकडाच्या गिरणीचा मालक अपघातात ठार
रत्नागिरी-लाकडाच्या गिरणीचा मालक अपघातात ठार

रत्नागिरी-लाकडाच्या गिरणीचा मालक अपघातात ठार

sakal_logo
By

लाकूड कापण्याच्या करवतीत
सापडून गिरणीमालक ठार

खंडाळ्यातील घटना; पाय घसरून पडल्याने अपघात

रत्नागिरी, ता. २६ : लाकडे कापणाऱ्या करवतीच्या पात्यामध्ये सापडल्याने शरीर चिरून गिरण मालकाचा जागीच मृत्यू झाला. रमेश पटेल असे त्यांचे नाव आहे. ही भयानक घटना तालुक्यातील खंडाळा येथे आज सकाळी साडेनऊ वाजता घडली. घटनेची नोंद जयगड पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश पटेल यांची वाटद खंडाळा येथे ‘विजय सॉ मिल’ आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते लाकडे चिरण्यासाठी मिल सुरू करायला गेले होते. विजेचा खटका सुरू केल्यानंतर ते मागे फिरत असतानाच त्यांचा पाय सरकला आणि ते करवतीच्या पात्यावर पडले. त्यांचा हात दंडातून कापला गेल्याने शरीरापासून वेगळा झाला. त्यानंतर करवतीचे ब्लेड त्यांच्या छातीत घुसले आणि करवत आरपार गेली. यामध्ये रमेश पटेल यांच्या छातीचा भाग पूर्णपणे कापून शरीराचे दोन तुकडे झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहिल्यानंतर घरच्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारील लोकांनी पटेल यांच्या गिरणीकडे धाव घेतली. जयगड पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याठिकाणी रक्ताचे पाट वाहत होते. हे चित्र पाहून साऱ्यांचे हृदय हेलावले. याचा जयगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71746 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top