
पान एक-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
टीपः swt2628.jpg
३२०० ओळ - विजयदुर्ग ः अपघातग्रस्त मोटारसायकल
टीपः swt2629.jpg
३२००१
ओळ - विजयदुर्ग ः अपघातात मृत्यू झालेले दोन मित्र
दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू
गिर्येजवळील प्रकार ः वर्षा पर्यटनासाठा आले असता दुर्घटना
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर गिर्ये येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोन तरुण पर्यटकांचा मृत्यू झाला. आकाश अरुण लोटके (वय २५) आणि गणेश मुरा गुणके (वय २२, दोघे रा. कसबे-डिग्रज, सांगली) अशी त्या दोघांची नावे आहेत. किल्ले विजयदुर्ग येथे मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी आले असताना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील बारा युवक सहा दुचाकींनी किल्ले विजयदुर्ग पाहण्यासाठी निघाले होते. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व मित्र सांगली येथून निघाले होते. किल्ला पाहून सायंकाळी ते पुन्हा सांगलीला परतणार होते. यातील आकाश लोटके व गणेश गुणके हे दोघेजण दुचाकीवरून पुढे होते, तर अन्य सहकारी मागून निघाले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विजयदुर्गच्या अलीकडे सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गिर्ये परिसरातील एका अवघड वळणावर समोरून एसटी येत होती. त्यामुळे दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी घसरून अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पडेल येथे उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी पोलिसांसह सोबतचे मित्र उपस्थित होते.
...................
चौकट
सहकाऱ्यांना धक्का
तालुक्यातील किल्ले विजयदुर्गच्या नजीक सुमारे पाच किलो अंतरावर असताना दोन मित्रांवर काळाने घाला घातला. या अपघातात दोन मित्र गमावल्यामुळे सहकारी मित्रांना मोठा धक्का बसला. किल्ला पाहून झाल्यावर सर्वजण सायंकाळी पुन्हा माघारी परतणार होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71785 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..