राजापूर ः मराठी सर्वदूर पोहचण्यासाठी मसापचा विस्तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः मराठी सर्वदूर पोहचण्यासाठी मसापचा विस्तार
राजापूर ः मराठी सर्वदूर पोहचण्यासाठी मसापचा विस्तार

राजापूर ः मराठी सर्वदूर पोहचण्यासाठी मसापचा विस्तार

sakal_logo
By

-rat27p10.jpg
32075
ः राजापूर ः मसापचे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचे राजापूर येथे स्वागत करताना जिल्हा बॅंकेचे संचालक महादेव सप्रे, डॉ. माधव सप्रे, प्रकाश देशपांडे आदी.
---------------
मराठी सर्वदूर पोहचण्यासाठी मसापचा विस्तार

प्रा. मिलिंद जोशी; राजापूर शाखेचा प्रारंभ, अध्यक्षपदी मदन हजेरी

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ आज मराठी शहरापूरतं राहिलेलं नसून ग्रामीण भागातील अनेक लेखक नव्या उमेदीने लिहू लागले आहेत. मराठी सर्वदूर पोहचण्यासाठी मराठी साहित्य परिषदेचा विस्तार करत आहोत, असे प्रतिपादन मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
मसापचे जिल्हाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये मसापच्या राजापूर शाखेचा आरंभ करताना या शाखेच्या अध्यक्षपदी बालसाहित्यिक मदन हजेरी यांची निवड करण्यात आली. या वेली प्रा. प्रकाश देशपांडे, सुनीताराजे पवार, मदन हजेरी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक डॉ. माधव सप्रे, समीर देशपांडे, प्रकाश आमकर, रवी जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मसापच्या राजापूर शाखेची निवड करण्यात आली. त्यामध्ये मदन हजेरी यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी गजानन पळसुलेदेसाई, कोषाध्यक्षपदी संजय बाकाळकर, सचिवपदी प्रदीप लिंगायत, सदस्यपदी मंदार सप्रे, अनंत देशकुलकर्णी, राजीव राणे, संजय घाणेकर, मनीषा गवाणकर यांची निवड करण्यात आली.
--------
चौकट
दरवर्षी तालुकावार साहित्य संमेलन ः डॉ. चोरगे
याप्रसंगी डॉ. चोरगे म्हणाले, राजापूर तालुक्यामध्ये मराठी भाषेतून लिहिणारे लेखक-लेखिका निर्माण होणे गरजेचे आहे. दरवर्षी तालुकावार साहित्य संमेलने होणार असून त्या माध्यमातून बालसाहित्य ते प्रौढ साहित्याचा विचार केला जाणार आहे. राजापूर तालुक्यातील ५१ सभासद करून मसापची शाखा सुरू होत असल्याचा आनंद आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71883 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..