राजापूर ः मक्का पायी प्रवास करणाऱ्या सिहाबचे राजापुरात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः मक्का पायी प्रवास करणाऱ्या सिहाबचे राजापुरात स्वागत
राजापूर ः मक्का पायी प्रवास करणाऱ्या सिहाबचे राजापुरात स्वागत

राजापूर ः मक्का पायी प्रवास करणाऱ्या सिहाबचे राजापुरात स्वागत

sakal_logo
By

-rat27p11.jpg
L32076
राजापूर ः पायी हजयात्रेसाठी केरळहून निघालेल्या सिहाब चित्तूर यांचे राजापूर येथे स्वागत करताना निजाम काझी व मुस्लिम बांधव.
---------------
मक्का पायी प्रवास करणाऱ्या
सिहाबचे राजापुरात स्वागत

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः केरळ येथील सिहाब चित्तूर हा तरुण केरळ ते सौदी अरेबिया-मक्का असा प्रवास पायी करण्यासाठी निघाला आहे. त्याचे तालुक्यातील दारूल हबीब मद्रसा मधीलवाडा जमात, शहर व तालुका परिसरातील मुस्लिम बांधव, मुस्लिम संघटनांसह युवकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. कब्रस्तान मशिदीमध्ये सिहाब याचे स्वागत करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. काही मुस्लिम बांधवांनी सिहाबसोबत तिवंदामाळपर्यंत पायी प्रवासही केला. या वेळी राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व दारूल हबीब मद्रसाचे अध्यक्ष निजाम काझी, मुफ्ती निजाम उस्ताद, मधीलवाडा जमातीचे इरफान ठाकूर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
..
चौकट
शांततेचा संदेश देण्याचा उद्देश
मुस्लिम धर्माची शिकवण, संस्कृती आणि शांततेचा संदेश देण्याच्या उद्देशाने केरळ येथील सिहाब चित्तूर या ३० वर्षीय तरणाने केरळ ते सौदी अरेबिया-मक्का असा सुमारे नऊ हजार कि.मी.चा पायी प्रवास करण्याचा निर्धार केला आहे. त्याचा आरंभ त्याने केरळ येथून केला आहे. २०२३ च्या हजयात्रेसाठी त्याचा हा प्रवास असून केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, सौदी अरेबिया, मक्का असा प्रवास करणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71888 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..