खेड ः कला कार्यशाळेत फुलली विद्यार्थ्यांची सृजनशीलता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः कला कार्यशाळेत फुलली विद्यार्थ्यांची सृजनशीलता
खेड ः कला कार्यशाळेत फुलली विद्यार्थ्यांची सृजनशीलता

खेड ः कला कार्यशाळेत फुलली विद्यार्थ्यांची सृजनशीलता

sakal_logo
By

-rat27p7.jpg
32073
ः खेड ः विविध कलाकृती साकारताना विद्यार्थी.
-----
-rat27p8.jpg
L32085
ः कागदी पिशव्या रंगवताना विद्यार्थी.
-----
- rat27p13.jpg
2L32078

, rat27p19.jpg
L32084
ः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या इंग्रजी शाळेच्या सभागृहात बनवण्यात आलेल्या विविध कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
-------------
(काही सुखद ......लोगो)
-----
नवनिर्मितीला साकारित रममाण कलाकारीत

कला कार्यशाळेत फुलली विद्यार्थ्यांची सृजनशीलता; श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ ः शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत सुप्त गुणांचा विकास करणे, विद्यार्थ्यांची बौद्धिक, शारीरिक, मानसिक पातळी उंचावणे, या हेतूने दरवर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचलित इंग्रजी माध्यमाची शाळा व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे कला कार्यशाळा घेतली जाते. या निमित्ताने विद्यार्थ्यांचा कार्यकौशल्य विकास, उत्पादनकार्यातील सुबकता, आकर्षकता, गती, निर्मिती प्रदर्शन व विक्री याबाबतची कौशल्ये विकसित करणे हाच एकमेव उद्देश कला आणि कार्यानुभव कार्यशाळेचा असतो.
या कार्यशाळेमध्ये संगीत, नृत्य, नाट्य, गायन, वादन, चित्र, शिल्प अशा कला प्रकारांचा आविष्कार पाहायला मिळतो. विद्यार्थी या कार्यशाळेचा आस्वाद घेत असताना त्यांच्यातील नवनिर्मिती आणि सृजनशीलता आपल्या लक्षात येते. साधारणतः जून महिन्याच्या १ ते १५ जून या कालावधीमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. यावेळी रेखाटन व रंगकाम, कोलाज, थम्ब आर्ट (बोटांच्या प्रिंट) वारली कला, घडी चित्रे, बाहुली काम, मातीकाम यातून फळे, फळभाज्या, प्राणी आदी तसेच भेटकार्ड, भित्तीचित्रे, कागदी फुले, मोझाईक आर्ट तसेच पाचवी ते नववीपर्यंत पेपरवरती मोनोप्रिन्ट घेऊन त्यापासून लहान-मोठ्या आकारांमध्ये पेपर बॅग, आकाशकंदील, रेखाटन व रंगकाम, वारली कला मधुबनी कला, मोझाईक कला, मंडाला भित्तीचित्रे, अमूर्त कला, वेगवेगळ्या थीमनुसार पोस्टर्स तयार करणे, कोलाज, मातीकाम, टाकाऊ पुठ्ठ्यांपासून फ्लॉवर पॉट तयार करणे, अंगाचा साबण, हॅण्डवॉश, मेणबत्त्या, पणत्या तसेच सुशोभीकरणाचे वेगवेगळे साहित्य असे विविध कलाप्रकार घेण्यात आले आहेत.
-----------------
चौकट
संस्था देते सर्व साहित्य
दरवर्षी बहुतांश शाळा १५ जूनला सुरू होतात; परंतु, १ जूनपासूनच आमची शाळा सुरू होते. त्या वेळी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना कला कार्यशाळेसाठीचे सर्व साहित्य पुरवण्यात येते. यासाठी कोणतीही फी विद्यार्थ्यांना आकारण्यात येत नाही. पंधरा दिवसांत चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. बाकीच्या इयत्तांचे विद्यार्थी आपल्या कल्पकतेने विविध कलात्मक वस्तू तयार करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत सुप्तगुणांचा विकास, बौद्धिक पातळी उंचावते, अशी माहिती श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल स्ट्रट संचलित इंग्रजी माध्यम शाळेच्या संचालिका शरयू यशवंतराव यांनी दिली.
...
चौकट
पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी..
पहिली ते नववीपर्यंतचे विद्यार्थी या कार्यशाळेसाठी उपस्थित असतात. प्रत्येक वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कलाकृती शिकवल्या जातात. आणि त्या प्रकारे आपली कल्पकता वापरून विद्यार्थी कलाकृती तयार करत असतात. यावर्षी या कार्यशाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अनेक कलाकृती शिकवल्या गेल्या आणि त्यातूनही नवनिर्मिती दिसून आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71892 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..