लांजा-विधवा प्रथा निर्मूलनाचा पालू ग्रामपंचायतीचा ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-विधवा प्रथा निर्मूलनाचा पालू ग्रामपंचायतीचा ठराव
लांजा-विधवा प्रथा निर्मूलनाचा पालू ग्रामपंचायतीचा ठराव

लांजा-विधवा प्रथा निर्मूलनाचा पालू ग्रामपंचायतीचा ठराव

sakal_logo
By

विधायकः लोगो
....
rat27p23.jpg
L32090
ः लांजा ः पतीच्या निधनानंतर त्यांचे सौभाग्यालंकार न उतरवणे याबाबत पालू ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते पाठिंबा देऊन एकमुखी ठराव केला.
-------------------
पती निधनानंतरही महिला सौभाग्यालंकार परिधान करणार

विधवा प्रथा निर्मूलनाचा पालू ग्रामपंचायतीचा ठराव;ग्रामसभेत निर्णय; दीपाली नामे यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २७ ः विधवा प्रथेचे निर्मूलन करतानाच त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि पतीच्या निधनानंतर त्यांचे सौभाग्यालंकार न उतरवणे याबाबत पालू ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते पाठिंबा देऊन एकमुखी ठराव करण्यात आला. अशा प्रकारचा ठराव करणारी पालू ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
पालू ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत शासन परिपत्रक आणि निर्णयानुसार समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावर सद्यःस्थितीत विधवांचे समाजातील स्थान व त्यांना मिळणारी वागणूक तसेच विधवा प्रथेबाबत समाजाची मानसिकता बदलणे व विधवांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे, समाजातील विविध उपक्रमात सहभागी करणे, पतीच्या निधनानंतर त्यांचे सौभाग्यालंकार न उतरवणे या विषयावर चर्चा होऊन सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. विधवा प्रथा निर्मूलनासाठी मंजुरी देण्याबाबतचा ठराव करण्यात आला.
ग्रामसभेला सरपंच वनिता नामे, उपसरपंच सागर गाडे, ग्रामसेवक महेश घेवदे, ग्रामपंचायत सदस्य अशोक नामे, विश्वनाथ मांडवकर, अश्विनी नामे, सुरेखा नामे, पूजा गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष विजय चव्हाण, माजी सरपंच संदीप गाडे, सीताराम नामे, संतोष कांबळे यांच्यासह वाडीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ, महिला तसेच अंगणवाडी सेविका, आशा‌सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश जावडेकर, गजानन नामे, अमोल जावडेकर, प्रभाकर अवसरे आदी उपस्थित होते.
-----------
चौकट
१४ वर्षांपासून सौभाग्यालंकार तसेच..
ग्रामसभेत पतीच्या निधनानंतर आपले सौभाग्यालंकार गेल्या १४ वर्षांपासून न उतरवणाऱ्या येथील दीपाली दीपक नामे या महिलेचा सरपंच वनिता नामे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71893 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..