
चिपळूण-अंमली पदार्थांपासून दूर राहून भविष्य घडवा
ratchl271.jpg
32091
चिपळूण ः अंमली पदार्थांविरोधी मार्गदर्शन करताना धनश्री करंजकर.
------------
अंमली पदार्थांपासून दूर राहून
भविष्य घडवाः धनश्री करंजकर
चिपळूण, ता. २७ ः सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे विद्यालयांत २६ जून हा अंमली पदार्थविरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. आजचे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे आधारस्तंभ आहेत. अंमली पदार्थांपासून दूर राहा, स्वतःचे अन् देशाचे भविष्य घडवायला हवे. त्यामुळे या सर्व वाईट प्रवृत्ती व सवयीपासून दूर राहावे, असे आवाहन या वेळी सावर्डे पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक धनश्री करंजकर यांनी केले.
अंमली पदार्थ व त्याचे सेवन करण्यामुळे होणारे विविध वाईट परिणाम, त्यामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक अशा घटकावर वाईट परिणाम कसे होतात. त्याचा त्या व्यक्तीला होणारा त्रास या सर्व बाबींची माहिती पोलिस उपनिरीक्षक करंजकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. या वेळी मुख्याध्यापक रफिक मोडक, उपमुख्याध्यापक विजय काटे, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, क्रीडाशिक्षक उदयराज कळंबे, अजय सूर्यवंशी, दिलीप डंबे, अशोक शितोळे, सुखदेव म्हस्के, सुधीर कदम उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71898 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..