शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे बांद्यात मोरजकर, पाटील यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे बांद्यात
मोरजकर, पाटील यांचा सत्कार
शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे बांद्यात मोरजकर, पाटील यांचा सत्कार

शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे बांद्यात मोरजकर, पाटील यांचा सत्कार

sakal_logo
By

L32060

बांदा ः नीलेश मोरजकर व जे. डी. पाटील यांचा गौरव करताना मान्यवर.

शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे बांद्यात
मोरजकर, पाटील यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः देव, देश आणि धर्म यासाठी कार्यरत असणाऱ्या शिवशंभू प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरांत आणि मनामनात रुजविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा देऊन सन्मानीय व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने येथील ''सकाळ''चे पत्रकार तथा सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे नियमित रक्तदाते नीलेश मोरजकर व बांदा केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक जे. डी. पाटील यांचा शिवराज्याभिषेक प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोसले यांच्या हस्ते श्री. मोरजकर व श्री. पाटील यांना गौरविण्यात आले. यावेळी श्री. मोरजकर यांनी शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेशचे कार्य स्पृहणीय आहे. हिंदवी स्वराज्य ज्यांनी निर्माण केले, ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक घरात व मनात असणे आवश्यक आहे, नव्हे ती काळाची गरज आहे, असे सांगत या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तुषार देसाई, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, पतंजली योग समितीचे शेखर बांदेकर, विकी केरकर, संजय नाईक, चंद्रकांत कदम, स्वानंद पवार, ज्येष्ठ शिक्षिका सरोज नाईक, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रशांत गवस, अक्षय मयेकर आदी उपस्थित होते. य़ावेळी श्री. भोसले यांनी, नियमित रक्तदान करणारे तसेच सिंधुदुर्ग व गोव्यातील शेकडो रुग्णांना तत्काळ रक्त उपलब्ध करून देणारे श्री. मोरजकर व बांदा केंद्रशाळेला विविध उपक्रमांच्या माध्यमातून पटसंख्येत जिल्ह्यात नंबर १ वर आणणारे उपक्रमशील शिक्षक श्री. पाटील यांचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71923 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..