जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर
जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर

जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर

sakal_logo
By

swt2728.jpg
32143
सिंधुदुर्गनगरीः नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना राज्य अध्यक्ष गजानन नाईक, मावळते जिल्हा अध्यक्ष गणेश जेठे व अन्य.

जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरसकर
सिंधुदुर्गनगरीत बैठकः कार्यवाहपदी देवयानी वरसकर बिनविरोध
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ः सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी खेळीमेळीत झाली. यावेळी पुढील दोन वर्षांसाठी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष म्हणून उमेश तोरसकर यांची, तर कार्यवाह म्हणून देवयानी वरसकर यांची एकमुखी निवड करण्यात आली.
जिल्हा पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष गणेश जेठे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे ही बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार समितीचे अध्यक्ष गजानन नाईक, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर व अशोक करंबळेकर, कोकण विभागीय अध्यक्ष नंदकुमार महाजन, मावळते सचिव उमेश तोरसकर, सहसचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत, सदस्य बाळ खडपकर, सदस्य सुधीर राणे, रमेश जोगळे, विद्याधर केनवडेकर, एकनाथ पवार, आनंद लोके उपस्थित होते.
गेल्या वर्षभरातील कामकाजाची माहिती यावेळी श्री. तोरसकर यांनी वाचून दाखविली. खजिनदार संतोष सावंत यांनी वर्षभरात झालेला खर्च व शिल्लक वाचून दाखविली. याला सभागृहाने मान्यता दिली. त्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पदांच्या निवडीसाठी अनेक सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु संतोष वायंगणकर, गणेश जेठे व ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी करीत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार बिनविरोध झालेल्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य निवडी यांच्या नावाचे वाचन केले. त्याला पूर्ण सभागृहाने एकमुखी मान्यता दिली. यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी चालू आर्थिक वर्षापासून जिल्हा पत्रकार संघाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारात प्रत्येक तालुक्यातील एका सदस्याचा समावेश करण्याचा तसेच यासाठी आवश्यक तीन नावे तालुक्याकडून मागवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

चौकट
नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष - उमेश तोरसकर, उपाध्यक्ष - बाळ खडपकर, विद्याधर केनवडेकर, दाजी नाईक, रमेश जोगळे, खजिनदार - संतोष सावंत, कार्यवाह - देवयानी वरसकर, सहकार्यवाह - महेश रावराणे, कार्यकारिणी सदस्य - लखू खरवत (दोडामार्ग), महेश सरनाईक (मालवण), प्रकाश काळे (वैभववाडी), दीपेश परब (वेंगुर्ले), संतोष राऊळ (कणकवली), हरिश्चंद्र पवार (सावंतवाडी), राजेंद्र मुंबरकर (देवगड), राजन नाईक (कुडाळ).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71972 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..