संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

-rat27p31.jpg
32126
खेड ः घेरा रसाळगड येथे शालोपयोगी साहित्य वाटप करताना शिवशंभूराजे मित्रमंडळाचे पदाधिकारी.
------------
शिवशंभूराजे मित्रमंडळातर्फे
शैक्षणिक साहित्य वाटप
खेड ः तालुक्यातील रसाळगड येथील शिवशंभूराजे मित्रमंडळाच्यावतीने तालुक्यातील घेरा रसाळगड शाळा क्र. १, जैतापूर शाळा क्र. १, निवाचीवाडी, पेठकिल्ले, बौद्धवाडी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाही भेट देण्यात आली. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विलास शिंदे, सुनील सकपाळ, प्रकाश सावंत, गणेश सावंत, अंकुश सकपाळ, मुख्याध्यापिका यादव, मुख्याध्यापक कडू, मुख्याध्यापिका सुषमा बने, मुख्याध्यापक पावरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
---
-rat27p32.jpg
32127
ः खेड ः ‘आयसीएस’ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करताना पोलिस निरीक्षक निशा जाधव.
----------
अमली पदार्थाविषयी जनजागृती
खेड ः तालुक्यातील भडगाव-खोंडे येथील ‘आयसीएस’ महाविद्यालयात पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ (अफू, चरस, गांजा, कोकेन) शरीराकरिता कशाप्रकारे हानिकारक आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी अमली पदार्थ सेवन न करण्याबाबत शपथग्रहण करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच ‘एहसास’अंतर्गत सायबर क्राईम, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन लॉटरी याविषयी माहिती देऊन जागरूक राहण्याचा सल्ला दिला.
-------------
‘सिलॅक्ट फायटर’ जिल्हा
अजिंक्यपद स्पर्धेला सुरवात
खेड ः तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्‍व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा विद्यालय तिसऱ्याया पिंच्याक सिलॅक्ट फायटर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेस प्रारंभ झाला. या प्रसंगी पिंच्याक सिलॅक्ट फायटर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष हर्षदीप सासणे, उपाध्यक्ष वैजेश सागवेकर, संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, किशोर साळवी, मास्टर सुनील शिंदे, मुख्याध्यापक अली, सुरेंद्र शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत जिल्ह्यातून १०० हून अधिक सहभागी झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y71991 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..