राजापूर ः राजापुर तालुक्यात सतत 4 दिवस पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः राजापुर तालुक्यात सतत 4 दिवस पाऊस
राजापूर ः राजापुर तालुक्यात सतत 4 दिवस पाऊस

राजापूर ः राजापुर तालुक्यात सतत 4 दिवस पाऊस

sakal_logo
By

(टीप- फोटो वरती लावून बातमी खाली घ्यावी.)
...
rat27p38.jpg
L32188
ः राजापूर ः बांधकाम विभागाने झाड हटवल्याने वाहतुकीसाठी मोकळा झालेला नाटे रस्ता.
...
-rat27p39.jpg
32189
ः कशेळी येथे खचलेला रस्ता.
...
-rat27p40.jpg
L32190
ः डोंगर येथे श्री गांगो मंदिरावर झाड पडून झालेले नुकसान.
----------------
राजापूर तालुक्यात पावसामुळे पडझड

झाड कोसळल्याने गांगो मंदिराचे नुकसान; पावसाचा जोर कायम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. तालुक्यामध्ये चौथ्या दिवशीही कायम आहे. आज सकाळपासून तालुक्यामध्ये पावसाचा चांगलाच जोर होता. यामध्ये कशेळी येथे रस्ता खचल्याची तर माडबन आणि डोंगर येथे झाड कोसळून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. डोंगर येथील श्री गांगो मंदिराच्या इमारतीवर झाड कोसळून मंदिराचे नुकसान झाले.
रविवारी (ता. २६) रात्री नाटे कोकरी येथील रस्त्यावर पडलेले झाड तहसीलदार शीतल जाधव यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बाजूला करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावरून जैतापूरकडे जाणारी वाहतूक आज सुरळीतपणे सुरू होती. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला असला तरी ढगाळ वातावरण कायम होते. कशेळी येथील दुर्गवाडी बंधार्‍याकडे जाणारा रस्ता अतिवृष्टीमध्ये खचल्याची घटना घडली तर, माडबन येथे माडाचे झाड कोसळले. मात्र, त्यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही. डोंगर येथील श्री गांगो मंदिराच्या इमारतीवर झाड कोसळून मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72038 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..