पावस-पटवर्धन शहर वाचनालयातर्फे निबंध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-पटवर्धन शहर वाचनालयातर्फे निबंध स्पर्धा
पावस-पटवर्धन शहर वाचनालयातर्फे निबंध स्पर्धा

पावस-पटवर्धन शहर वाचनालयातर्फे निबंध स्पर्धा

sakal_logo
By

पटवर्धन शहर वाचनालयातर्फे निबंध स्पर्धा

पावस, ता. २७ ः रत्नागिरी शहरातील शहर वाचनालय शिवाजीनगर संचलित श्रीमती विमलाताई पटवर्धन शहर वाचनालयातर्फे (कै.) मु. ना. तथा नाना पानवलकर स्मृती निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. रत्नागिरी शहर मर्यादित आणि परिसरातील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. बक्षीस समारंभ ५ ऑगस्टला होणार आहे.
स्पर्धेसाठी युवापिढी- बेकारीच्या समस्येतून सावरण्याची माझी संकल्पना, युवापिढी- वाचनालयाच्या किती जवळ किती दूर-वाचनाकडे वळण्यासाठी माझी संकल्पना, प्लॅस्टिक मुक्तीच्या चळवळीत मी आणि माझे कुटुंब अशा प्रकारे सहभाग घेणार, माझ्या समाज कार्याच्या संकल्पना- माझे समाजकार्यात योगदान, स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात माझ्या स्वत:कडून, समाजाकडून आणि शासनाकडून अपेक्षा हे पाच विषय देण्यात आले आहेत.
निबंध फुल स्केप साईज कागदावर स्वलिखित पाठवावेत. त्यासाठी वेगळे गुण ठेवण्यात येतील. निबंधाची ३ ते ५ पाने अपेक्षित असून ती पाठपोठ लिहिलेली नसावीत. शब्दमर्यादा १०० ते १५०० आहे. निबंध १५ जुलैपर्यंत सकाळी ८ ते ११ व दुपारी ३.३० ते ७ या वेळेत सोमवार सोडून आणून द्यावेत. याबाबत अधिक माहितीसाठी विमलाताई पटवर्धन शहर वाचनालय, छ. शिवाजी महाराज क्रीडांगणाजवण, स्वामी विवेकानंद मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. निबंधावर नाव अथवा ओळख नमूद करू नये. या स्पर्धेसाठी विजेत्यांना प्रशस्तिपत्रक, डॉ. मु. न. पानवलकर लिखित पुस्तक आणि रोख रक्कम दिली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72039 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..