''भटके-विमुक्त''च्या मालवण तालुकाध्यक्षपदी गोसावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''भटके-विमुक्त''च्या मालवण तालुकाध्यक्षपदी गोसावी
''भटके-विमुक्त''च्या मालवण तालुकाध्यक्षपदी गोसावी

''भटके-विमुक्त''च्या मालवण तालुकाध्यक्षपदी गोसावी

sakal_logo
By

swt2736.jpg
32201
मालवणः गोसावी यांना नियुक्तीपत्र देताना नवलराज काळे व अन्य.

‘भटके-विमुक्त’च्या मालवण
तालुकाध्यक्षपदी गोसावी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ः तालुका भटके-विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच (कै.) नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट मसुरेचे अध्यक्ष शांताराम उर्फ बाळासाहेब गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार नीलेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनानुसार ही निवड करण्यात आली.
कुडाळ येथील भाजपच्या कार्यालयात श्री. गोसावी यांना जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत व समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्न करू, असे श्री. गोसावी यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रामध्ये श्री. गोसावी यांचे मोठे योगदान आहे. यावेळी मालवण शक्तीकेंद्र प्रमुख नीलम पांजरी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश झोरे, शशिकांत इंगळे, राजू इंगळे, सुरेश झोरे, दीपक खरात, विनोद मुणगेकर, राजाराम पाटील, हर्ष गावकर, रामचंद्र मसुरकर, शैलेश मयेकर आदी उपस्थित होते. श्री. गोसावी यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72050 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top