
पान एक-चक्कर येऊन कोसळल्याने सावंतवाडीत विद्यार्थ्याचा मृत्यू
३२१७२ - कौस्तुभ पेडणेकर
चक्कर येऊन कोसळल्याने
महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू
सावंतवाडीत घटना; मुळचा शिरशिंगेतील
सावंतवाडी, ता. २७ ः सावंतवाडीत घरातून महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थ्याला चक्कर आल्याने तो रस्त्यावर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. कौस्तुभ प्रवीण पेडणेकर (वय १८, रा. शिरशिंगे, सध्या रा. खासकीलवाडा-सावंतवाडी) असे त्याच नाव आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली.
कळसुलकर ज्युनिअर कॉलेजचा कौस्तुभ विद्यार्थी होता. तो कुटुंबासहित खासकीलवाडा येथे भाडेतत्त्वावर राहत होता. तो, आज नेहमीप्रमाणे सकाळी उठून महाविद्यालयात जाण्यासाठी निघाला. घराकडून काही अंतर चालत आला असता तो अत्यवस्थ झाला आणि खासकीलवाडा येथील शाळा नंबर चारच्या समोर चक्कर येऊन कोसळला. अचानक घडलेल्या प्रसंगाने सगळेच घाबरले. त्याला लगेच येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तो बारावी वाणिज्य शाखेत शिकत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. त्याचे वडील कोल्हापूर येथे एका हॉटेलमध्ये काम करतात. त्याला छोटी बहीण आहे. गावात येण्या-जाण्याची अडचण असल्यामुळे त्याचे कुटुंब येथील खासकीलवाडा येथे वास्तव्यास होते. घटनेची माहिती मिळताच अनेक मित्रांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कळसुलकर महाविद्यालयात तसेच शाळेत कौस्तुभला आदरांजली अर्पण करून कामकाज बंद ठेवण्यात आले.
...................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72093 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..