
धामापुरात ट्रकला डंपरची धडक
swt२७४३.jpg
३२२५०
धामापूरः ट्रक-डंपर अपघाताने वाहतूक ठप्प झाली.
धामापुरात ट्रकला डंपरची धडक
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ः चौके-कुडाळ मार्गावर धामापूर येथे कुडाळहुन चौकेच्या दिशेने जाणारा ट्रक (केए-२३ बी-४९८८) आणि चौके येथून चिरे वाहतूक करणारा डंपर (केए-१९ डी-५५६१) यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. ही घटना आज सायंकाळी ६ वाजता घडली. या अपघातामुळे संपूर्ण रस्ता बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रसंगावधान राखून डंपर चालकाने बाजूला उडी मारल्याने त्याला दुखापत झाली नाही. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर केबिनमध्ये अडकलेला ट्रक चालक जखमी झाला. त्याला स्थानिक तरुणांनी बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कुडाळ येथे दाखल केले. पोलिस ठाण्याचे सुनील चव्हाण आणि सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72113 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..