
योगामुळे अनेक लाभ - नाईक
swt2811.jpg
32290
वेंगुर्लेः महासंजीवनी ध्यान प्रशिक्षण वर्गात बोलताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक. व्यासपिठावर आध्यात्मिक गुरू श्री सत्यमामुनी स्वामीयाल.
योगामुळे अनेक लाभ
श्रीपाद नाईक ः वेंगुर्लेत ध्यान प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः ध्यान हा अष्टांग योगाचा एक घटक मानला आहे. परमेश्वर प्राप्तीसाठीच्या मार्गातील ध्यान ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. मध्यंतरी ही विद्या दाबण्याचे खूप प्रयत्न झाले. पण, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे योग आणि ध्यानासह योगाची इतर अंगे विश्वासाठी खुली झालेली आहेत. जगाला योगचे लाभ मिळू लागले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
परफेक्ट अकॅडमी, वेंगुर्लेच्या वतीने कॅम्प, वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात आयोजित केलेल्या मोफत महासंजीवनी ध्यान प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केल्यानंतर श्री. नाईक बोलत होते.
याप्रसंगी आध्यात्मिक गुरू श्री सत्यमामुनी स्वामीयाल, आंजनेय ट्रस्टच्या श्रीमती वृंदा श्रीकुमार, परफेक्ट अकॅडमीचे सर्वेसर्वा राजाराम परब, वेंगुर्ले नगरपालिकेचे माजी अध्यक्ष दिलीप गिरप, सिंधुदूर्ग भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘समाजातील सामान्यातल्या सामान्य घटकाला योगचा लाभ मिळावा, लोक स्वस्थ, सदृढ आणि सुखी व्हावे. माणूस सुखी झाला तर राष्ट्र सुखी होईल, पर्यायाने जग सुखी होईल, हा आपल्या पूर्वजांचा, आपल्या ऋषि-मुनिंचा उदात्त हेतू होता. परंतु, हा अनमोल ठेवा जगापुढे येऊ नये, यासाठी प्रयत्न झाले. पण, आज जगाला योगचे लाभ मिळू लागले आहेत. विश्वाने योगला मान्यता दिलेली आहे. २५ जूनला बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियममध्ये झालेल्या मेडिटेशन प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. विद्यार्थ्यांसह समाजातील विविध थरांतील लोकांनी या वर्गाचा लाभ घेतला.’’
पारंपारिक समई प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्री सत्यमामुनी स्वामिया यांनी भगवान हनुमानाची पूजा केली. नंतर आंजनेय ट्रस्टच्या कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला व त्यानंतर ध्यान वर्ग घेण्यात आला. या ध्यान वर्गाला विद्यार्थ्यांसह समाजातील विविध थरातील लोकांनी भाग घेतला. श्री. परब यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आंजनेय ट्रस्टच्या वृंदा श्रीकुमार यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेतला व ध्यान वर्ग आयोजित करण्या मागचा हेतू सांगितला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72202 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..