''साहित्य प्रेरणा'' कट्टयाची बैठक आजगावात उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''साहित्य प्रेरणा'' कट्टयाची
बैठक आजगावात उत्साहात
''साहित्य प्रेरणा'' कट्टयाची बैठक आजगावात उत्साहात

''साहित्य प्रेरणा'' कट्टयाची बैठक आजगावात उत्साहात

sakal_logo
By

L३२२९२

आजगाव ः येथील साहित्य प्रेरणा कट्टयाच्या वीसाव्या मासिक बैठकीस उपस्थित साहित्यप्रेमी.

''साहित्य प्रेरणा'' कट्टयाची
बैठक आजगावात उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः आजगाव येथील ''साहित्य प्रेरणा'' कट्टयाची वीसावी मासिक बैठक नुकतीच आजगाव ग्रंथालयाच्या सभागृहात झाली. यावेळी निवृत्त शिक्षक आत्माराम बागलकर यांच्या हस्ते श्रीफळ व पुस्तक भेट देऊन साहित्य संगम या वाड्ःमयीन व्यासपीठाचे अध्यक्ष तथा तोरसे, गोवा येथील शासकीय विद्यालयाचे अध्यापक सुभाष शेटगांवकर यांचे स्वागत करण्यात आले. या मासिक बैठकीत मांद्रे (गोवा) येथील साहित्य संगम या वाड्ःमयीन व्यासपीठाचे अध्यक्ष शेटगांवकर यानी (कै.) रणजीत देसाई यांच्या संगीत ''हे बंध रेशमाचे'' या नाटकावर विवेचन केले. आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात शेटगांवकर यानी प्रारंभी नाटकाची पार्श्वभूमी सांगून नाटकातील पात्रांचा सविस्तर परिचय केला. त्यानंतर त्यानी नाटकातील महत्वपूर्ण प्रसंग कथन करून संपूर्ण नाटकाचे कथानक सूत्ररुपाने उपस्थित रसिकांसमोर सादर केले. शेवटी कवयित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या या नाटकातील पदांचाही त्यानी आढावा घेतला. मुग्धा सौदागर हिने या नाटकातील ''विकल मन आज असहाय्य... हे पद आपल्या सुरेल आवाजात सादर केले. बैठकीच्या प्रारंभी कट्टयाचे समन्वयक कवि विनय सौदागर यानी स्वागत व प्रास्ताविक करून वक्त्यांचा परिचय केला. विनय सौदागर यांनी शेवटी ऋणनिर्देश केला. बैठकीस मांद्रे (गोवा) येथील ''साहित्य संगम''चे कार्यवाह प्राचार्य गजानन मांद्रेकर, डॉ. सुधाकर ठाकूर, डॉ. मधुकर घारपुरे, विनय फाटक, अनिल निखार्गे, उत्तम भागीत, ईश्वर थडके, दत्तगुरू कांबळी, विनायक उमर्ये, एकनाथ शेटकर, विशाल उगवेकर, प्रकाश वराडकर, चंद्रकांत गवंडे, सोमा गावडे, मीरा ठाकूर, अनिता सौदागर व प्रिया आजगावकर हे साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72209 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..