
देवगड हायस्कूलमध्य़े गुणवंतांचा सत्कार
L३२२९५
देवगड ः येथील हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
देवगड हायस्कूलमध्य़े
गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ ः येथील शेठ हायस्कूलमधील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी मुख्याध्यापक संजीव राऊत, स्थानीय समितीचे खजिनदार दत्तात्रय जोशी, सदस्य आणि माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, पर्यवेक्षक तानाजी पाटील, दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. माध्यमिक शालांत परीक्षेतील शाळेमध्ये पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व अभिनंदन प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ९० टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांनाही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. शाळेत पहिल्या तीन आलेल्या मनस्वी बांदिवडेकर (९७ टक्के), मिहीर सकपाळ (९६ टक्के), वेदांती पिसे (९६ टक्के) आणि गौरी धुरी (९५.८०) या विद्यार्थ्यांनी तालुक्यांमध्ये देखील प्रथम तीन क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी दत्तात्रय जोशी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन केले. श्री. राऊत आणि श्री. शिंगाडे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांमधून मनस्वी बांदिवडेकर, वेदांती पिसे, मिहीर सकपाळ तसेच बारावीतील केतकी आंबेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांमधून स्वप्नजा बिर्जे, महेश सकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक तानाजी पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अजित सुरुंगले यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72210 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..