मंडणगड - शिरगाव ग्रामपंचायतीकडून शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - शिरगाव ग्रामपंचायतीकडून शैक्षणिक साहित्य वाटप
मंडणगड - शिरगाव ग्रामपंचायतीकडून शैक्षणिक साहित्य वाटप

मंडणगड - शिरगाव ग्रामपंचायतीकडून शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

-rat28p15.jpg
32337
ः शेनाळे ः शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप करताना सरपंच विश्वनाथ सावंत, सुनील आईनकर, शिक्षक व ग्रामस्थ.
-------------
शिरगावात शैक्षणिक साहित्य वाटप

सरपंच सावंतांचा पुढाकार; शैक्षणिक प्रगतीला हातभार
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २८ ः शिरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने आयएसओ मानांकित जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शेनाळे शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप केले. त्यामुळे उपक्रमशील शाळा अशी ओळख प्राप्त झालेल्या शेनाळे शाळेला त्याचा मोठा फायदा होणार असून शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लागणार आहे. ही शाळा तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपाला आली असून, अनेक देणगीदारांच्या मदतीने शाळेने अनेक भौतिक सुविधा परिपूर्ण केल्या आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक सुनील आईनकर यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. २१ जूनला शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वनाथ सावंत यांच्या हस्ते २० खुर्च्या, १ ऑफिस कपाट, १ डिजिटल बोर्ड, अत्याधुनिक साऊंड सिस्टिम शाळेला भेट देऊन शाळेच्या विकासामध्ये आणखी भर टाकण्यात आली. ग्रामपंचायतीने पूर्ण केलेल्या या उपक्रमाबद्दल तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. सरपंच विश्वनाथ सावंत यांनी शाळेला आवश्यक असणारे वाय-फायसाठी येणारे रिचार्ज उपलब्घ करून देण्याची घोषणा करत विद्यार्थ्यांना एक वेगळी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, कमिटी व पालक यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच विश्वनाथ सावंत, मुख्याध्यापक सुनील आईनकर, अध्यक्ष नितीन जाधव, शिक्षक गणेश गुळेकर, सतीश खैरे, संदीप राठोड उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72243 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top