रत्नागिरी- सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करणारा लोकराजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करणारा लोकराजा
रत्नागिरी- सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करणारा लोकराजा

रत्नागिरी- सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करणारा लोकराजा

sakal_logo
By

-rat28p17.jpg
L32344
- रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रजेच्या राजर्षी शाहू महाराज जयंतीदिनी अभिवादन करताना प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी.
--------------
सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करणारा लोकराजा

डॉ. साखळकर; गोगटेमध्ये शाहू महाराजांना आदरांजली
रत्नागिरी, ता. २८ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करावयाचा असतो, हे आपल्या कृतीतून दाखविण्याचे कार्य केले. त्यांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली. वसतिगृहांची स्थापना केली, कला व कलाकारांना उदार आश्रय दिला, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. हा प्रजेच्या कल्याणासाठी झटणारा राजातील मनुष्य व मनुष्यातील राजा होता, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते होते. त्यांनी आरक्षणाची प्रक्रिया शांततापूर्ण मार्गाने आपल्या संस्थानात प्रत्यक्षात अंमलात आणली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी आणि जलव्यवस्थापन या कार्याला तोड नाही. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय सुधारणा घडविल्या, अशा या द्रष्ट्या राजर्षींच्या कर्तृत्वाची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या निमित्ताने साध्य करता आले, असे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सांगितले.
कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्र गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए. बी. उरुणकर, निबंधक रवींद्र केतकर, ग्रंथपाल किरण धांडोरे यांच्यासह अनेक विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यक्रम समितीप्रमुख डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72246 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..