शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद - आमदार राजन साळवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mla Rajan Salavi
लांजा-शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद

शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद - आमदार राजन साळवी

लांजा - शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे. कोण कुठे गेले तरीही जिल्ह्यातील शिवसैनिक आपल्या पाठीशी उभा असेल, असे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सांगून आलो आहे. तसेच हीच ताकद शिवसेनेचा भगवा राज्यभर डौलाने फडकवेल, असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

मुंबईतून आमदार डॉ. राजन साळवी यांचे लांजात आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आवाज कुणाचा, शिवसेनेचा... हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा विजय असो.... कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला... राजन साळवी आगे बढो, हम तुम्हारे साथ है... ,अशा गगनभेदी घोषणा देत लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात आमदार राजन साळवी यांचे लांजा बसस्थानक येथे स्वागत करण्यात आले.

शिवसेना तालुका कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लांजा शहरातील बसवेश्वर सदन येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विभागप्रमुख शरद चरकरी, नगराध्यक्ष मनोहर बाईत आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे यांच्यासोबत सदैव राहणार

ज्या शिवसेनेमुळे, ज्या शिवसैनिकांमुळे मी तीनवेळा आमदार झालो, त्या शिवसेनेशी व शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत सदैव राहणार. यापूर्वी ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली, त्यांची काय अवस्था झाली, हे सर्वांना माहिती आहे, असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72248 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top