
पावस ः दोन वर्षांनी पुन्हा दिसले पेंटेड लेडी फुलपाखरू
rat28p9.jpg
L32330
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथील हौशी फोटोग्राफर आदित्य भट याने कुर्धे कातळसडा येथे पेटेंड लेडी हे फुलपाखरू कॅमेऱ्यात टिपले.
-----------------
दोन वर्षांनी दिसले पेंटेड लेडी फुलपाखरू
कुर्धेसडा येथे आढळ; ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका खंड वगळता सर्वत्र संचार
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २८ ः सन २०१९ नंतर गेली २ वर्षे रत्नागिरी आणि परिसरात हे फुलपाखरू दिसलंच नव्हतं. यावर्षी पुन्हा दिसलंय. ते कुर्धेसडा येथे पेंटेड लेडी जगातील सर्वात परिचित फुलपाखरांपैकी एक आहे, असे रत्नागिरीतील कुर्धे, येथील हौशी फोटोग्राफर आदित्य भट यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून येथील कातळसड्यावर टिपले.
या संदर्भात भट म्हणाले, रत्नागिरीतील फुलपाखरू संशोधक मंगल राणे व नेत्रा पालकर-आपटे यांनी दुर्लभ झालेल्या फुलपाखराविषयी माहिती दिली. हे फुलपाखरू जवळजवळ सर्व खंड आणि हवामानात आढळते. पेंटेड लेडी फुलपाखरे ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडात राहतात. सर्वांना कुरणापासून रिकाम्या जागेपर्यंत सर्वत्र पेंटेड लेडी फुलपाखरू सापडतील. ते फक्त उबदार हवामानात राहत असले तरीही पेंटेड लेडी फुलपाखरू बहुतेकदा वसंत ऋतु आणि शरद ऋतूमध्ये थंड प्रदेशात स्थलांतर करतात. याच्या जगभरातील संचाराचे प्रमुख कारण म्हणजे यांचं खाद्य झाड. थिसल या प्रकारच्या रानटी झाडांवर ही फुलपाखरे आपला सुरवंट व्यवस्थेतील काळ व्यतीत करतात आणि याच झाडाची पाने खातात. अशा प्रकारची रानझुडपे जगभर सापडतात आणि म्हणून त्यांच्यावर वाढणारे पेंटेड लेडी फुलपाखरुसुद्धा जगभर सापडते. स्थलांतर करताना ही फुलपाखरे जमिनीपासून खूप उंच उडत नाहीत. स्थलांतर होताना मोठ्या संख्येच्या थव्याने होते.
--------
कोट
मला फोटोग्राफीची आवड असल्यामुळे सर्वत्र भटकंती सुरू असते. माझ्या आवडीच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू असतो. त्या भटकंतीच्या माध्यमातूनच हे फुलपाखरू भ्रमंती करत असताना दृष्टीस पडल्यामुळे त्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपले व या फुलपाखरांच्या प्रजाती गतिमान होण्याकडे लक्ष देणार आहे.
--आदित्य भट, फोटोग्राफर, कुर्धे
-----------------
चौकट
हद्द स्वत:च आखून घेतात, राखणही करतात
पेंटेड लेडी फुलपाखरांचे नर आपली हद्द स्वत:च आखून घेतात आणि त्याची राखणही करतात. मादी पेंटेड लेडी गोरखमुंडी आणि याच प्रकारातील रानझुडपांवर अंडी घालते. जाडसर पानांचे हे झुडूप पाणथळ ठिकाणी हमखास आढळते. अंड्यामधून बाहेर येणारे सुरवंट ही पाने खातात. शिवाय या पानांमध्ये स्वत:साठी रेशमी धाग्यांचे लेपनही बनवतात. या लेपनामध्ये बसून स्वत:चा बचाव करतात. सुरवंटापासून फुलपाखरू व्हायला थंड प्रदेशात जवळपास दोन महिने लागतात, तर उबदार वातावरणात हीच वाढ दीड महिन्यात पूर्ण होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72267 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..