
पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवडीची गरज
L३२३६४
वैभववाडी ः येथील आनंदीबाई रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड केली.
पर्यावरण समतोलासाठी
वृक्ष लागवडीची गरज
विनोद बेलवाडकर ः वैभववाडीत विद्यार्थ्यांतर्फे वृक्षारोपण
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २८ ः पर्यावरणीय असमतोलामुळे अनियमित पाऊस, पूर, दुष्काळजन्य स्थिती असे प्रकार वाढीस लागले आहेत. पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण करा, असे आवाहन वनविभागाचे वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर यांनी येथे केले.
येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आणि सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या माध्यमातून कुर्ली-घोणसरी धरण परिसरात १२० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे एस. व्ही. पुराणिक, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, लेफ्टनंट रमेश काशेट्टी, वनस्पती विभागाचे डॉ. व्ही. ए. पैठणे आदी उपस्थित होते.
श्री. बेलवडकर म्हणाले, "पर्यावरणाचा ऱ्हास ही एक जागतिक समस्या बनली आहे. जगातील सर्व तज्ज्ञ या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु कार्बनत्सर्जन या समस्येवर सध्या वृक्ष लागवड करणे हाच एकमेव उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे वृक्षांचे संवर्धन करणे, देशी-वृक्षाच्या संगोपनासह लागवड करणे, अधिक कार्बन शोषून घेणाऱ्या वनस्पतींची लागवड करणे हे उपाय सजग नागरिकांनी केले पाहिजेत. प्रत्येकाने वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे. फक्त उत्पादन एवढाच निकष न ठेवता पर्यावरणाचा विचार सर्वांनी करणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एका तरी देशी झाडाची लागवड करून वृक्षारोपणाच्या या मोहिमेत हातभार लावला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी कुर्ली-घोणसरी धरण परिसरात १२० देशी वृक्षांची लागवड केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72277 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..