हेलन केलर जयंती वेंगुर्लेत उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेलन केलर जयंती
वेंगुर्लेत उत्साहात
हेलन केलर जयंती वेंगुर्लेत उत्साहात

हेलन केलर जयंती वेंगुर्लेत उत्साहात

sakal_logo
By

L32385

वेंगुर्ले ः शिवानी आळवे यांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

हेलन केलर जयंती
वेंगुर्लेत उत्साहात
वेंगुर्ले, ः अंधत्वावर विजय मिळविणारी जगप्रसिद्ध आणि कर्तृत्वसंपन्न अमेरिकन महिला व लेखिका हेलन केलर यांची जयंती सोमवारी (ता. २७) वेंगुर्ले येथे साजरी करण्यात आली.
गटसाधन केंद्र वेंगुर्लेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी विषयतज्ज्ञ शिवानी आळवे व विठ्ठल सावंत यांनी हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी मिलिंद टिळवे, प्रवीण बावलेकर, तेजस्विनी तांडेल, संजीव बुच्छलवार, सर्वेश राऊळ, शिलकांत कावले, अनिल भोकरे आदी उपस्थित होते. हेलन केलर यांच्या आयुष्यात फक्त अंधःकारच होता; परंतु त्यांनी आपल्या हिंमतीवर आणि चिकाटीने आपलेच नाही तर आपल्यासारख्या हजारो जणांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला. जगण्याची नवी उमेद दिली. दिव्यांगांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, ते सुद्धा इतरांपेखा कमी नाहीत, याची प्रचिती जगाला दिली. दिव्यांग शिक्षणाचे धडे गिरवू शकतील, असे विपुल साहित्य हेलन केलर यांनी निर्माण केले, अशी माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. मिलिंद सरवदे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72307 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..