राजापूर-विखारेगोठणे-डोंगरे रस्त्याची दुरवस्था कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-विखारेगोठणे-डोंगरे रस्त्याची दुरवस्था कायम
राजापूर-विखारेगोठणे-डोंगरे रस्त्याची दुरवस्था कायम

राजापूर-विखारेगोठणे-डोंगरे रस्त्याची दुरवस्था कायम

sakal_logo
By

-rat28p27.jpg
32389
ः राजापूर ः तालुक्यातीलते डोंग विखारेगोठणे र या ग्रामीण मार्ग १८ च्या विखारे गोठणे ते डोंगर रस्त्याची झालेली दुरवस्था.
--------------
विखारेगोठणे-डोंगरे रस्त्याची दुरवस्था कायम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः गतवर्षीच्या अतिवृष्टीत पूर्णपणे दुरवस्था झालेल्या तालुक्यातील हातिवले विखारेगोठणे ते डोंगर या ग्रामीण मार्गाची दूरवस्था कायम आहे. त्यामुळे या भागातील दळणवळण व्यवस्था ठप्प झाली आहे. या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्यास डोंगर व विखारेगोठणे गावातील ग्रामस्थांसमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा डोंगर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश मराठे व विखारेगोठणे गावातील मंगेश पावसकर यांनी दिला आहे.
गतवर्षी जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये राजापूर तालुक्यामध्ये अनेक रस्ते नादुरुस्त झाले. त्यापैकी हातिवले विखारेगोठणे ते डोंगर या ग्रामीण मार्गावरील विखारेगोठणे ते डोंगरदरम्यान रस्ता खचल्याने वाहतूक पूर्ण बंद झाली होती. यानंतर तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पुढारी, पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन व फोटो काढून आपली हौस भागवून घेतली; परंतु रस्त्याची दुरुस्ती आजही झालेली नाही. आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा याचे परिणाम दिसून येतील. तरी वेळीच कार्यवाही करण्याची मागणी मराठे व पावसकर यांनी केली आहे.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72345 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..