''जल जीवन''च्या कृती आराखड्यास मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''जल जीवन''च्या कृती आराखड्यास मंजुरी
''जल जीवन''च्या कृती आराखड्यास मंजुरी

''जल जीवन''च्या कृती आराखड्यास मंजुरी

sakal_logo
By

‘जल जीवन’ कृती आराखड्यास मंजुरी
७३३ योजना ः साडे तीनशे कोटी खर्चास मान्यता
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या आज झालेल्या बैठकीत २०२२-२३ च्या कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यामध्ये ७३३ योजनांचा समावेश असून, ३३० कोटी ६९ लाख खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी ही मान्यता दिली आहे.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जल संधारणचे कार्यकारी अभियंता यू. आर. महाजनी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संतोष सावर्डेकर उपस्थित होते.
श्री. सावर्डेकर यांनी सुरुवातीला सद्यस्थितीची माहिती दिली. एकूण ४३१ ग्रामपंचायती असून, देण्यात आलेली नळ जोडणीची संख्या १ लाख २५ हजार ८७ इतकी आहे. २०२२-२३ च्या कृती आराखड्यानुसार ७३३ योजना आहेत. त्याची किंमत ३३०.६९ कोटी इतकी आहे. जल जीवन मिशन अंतर्गत योजनांवर झालेला खर्च ७.९९ कोटी इतका असून, कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या १६१ योजना आहेत.
...............
चौकट
कार्यारंभ आदेश योजना वाढवा
आजच्या बैठकीत २०२१-२२ मधील प्रस्तावित कामांना तसेच २०२२-२३ च्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता घेण्यात आली. जल जीवन मिशन अंतर्गत कार्यारंभ आदेश देण्यात आलेल्या योजना वाढवाव्यात, त्यांच्या पूर्णतेवर अधिक भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिल्या.
...............
कोट
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून पुनर्रचना करण्यात आली आहे. यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत ''हर घर नल से जल'' प्रमाणे पाणीपुरवठा करण्यास शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लीटर प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रगतीपथावर असणाऱ्या योजनांची कामे पूर्ण करून या मिशनअंतर्गत जिल्ह्याला अग्रेसर ठेवावे.
- के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी
..............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72350 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..