चिपळूण ः गोवळकोट रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः गोवळकोट रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार
चिपळूण ः गोवळकोट रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार

चिपळूण ः गोवळकोट रस्त्यावर मगरीचा मुक्त संचार

sakal_logo
By

-rat28p24.JPG
L32362
ः चिपळूण ः शहरातील नागरी वस्त्यांमध्ये मगरी मोकाट फिरू लागल्या आहेत.
------------
रस्त्यावर मगर आली अन पादचाऱ्यांची बोबडी वळाली!

गोवळकोट रस्त्यावरील दर्शन;
चिपळूण, ता. २८ ः शिव आणि वाशिष्ठी नदीतील मगरी आता शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरू लागल्या आहेत. नागरिकांना सोमवारी रात्री गोवळकोटकडे जाणाऱ्या रस्त्यावर मगर चालताना आढळली.
वाशिष्ठी नदी व खाडीमध्ये असणारे नैसर्गिक बेट हे येथील मगरींचे मुख्य अधिवास आहे. तेथे मगरींची घरटी, अंडी आणि पिल्ले असतात; परंतु नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये येथील बेटे काढले जात आहेत. नदीतील झाडीझुडपेही काढण्यात आली आहेत. त्यामुळे नदीमधील मगरींचे अस्तित्व धोक्यात आले आले आहे. चिपळूणमध्ये येत असलेल्या पुरावर उपाययोजना करण्यासाठी शिव आणि वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गाळ काढताना वाशिष्ठी नदीतील अनेक वर्षापूर्वीचे जुने बेटही करण्याचा घाट घातला जात आहे. पालिकेने शिवनदीतील गाळ काढून नदी स्वच्छ केली. नदीकिनारी असलेल्या झाडीझुडपेही तोडण्यात आली. त्यामुळे शिवनदीतील मगरींचा अधिवास संपु्ष्टात आला आहे. आतापर्यंत शिवनदीत मगरी विसावा घेण्यासाठी निर्धास्तपणे वावरत होत्या. एखाद दुसरी मगर मानवी वस्तीत येत होती; मात्र या मगरींनी कधी कोणावर हल्ला केला नाही. आता शिवनदीतील झाडीझुडपे काढल्यामुळे मगरींचा विसावा घेण्याचे नैसर्गिक ठिकाण संपुष्टात आले आहे. त्यामुळे मगरींचा वावर मानवी वस्तीच्या दिशेने सुरू झाला आहे.
..
चौकट
चार फूट लांबीची मगर आढळली
चिपळूण शहरात कामानिमित्त आलेले नागरिक रात्री गोवळकोटकडे जात असताना त्यांना सुमारे चार फूट लांबीची मगर चक्क रस्त्यावरून चालताना आढळली. नागरिकांनी या मगरीचे चित्रीकरण करण्यास सुरवात केली. काहींनी लाईट देत हॉर्नही वाजवले; मात्र रस्त्याच्या मध्यभागातून चालणाऱ्या या मगरीने न घाबरता रस्ताही क्रॉस केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72360 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top