राजापूर ःदेवराईतील गांगो मंदिराच्या नुकसानीचा पंचनामा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःदेवराईतील गांगो मंदिराच्या नुकसानीचा पंचनामा करा
राजापूर ःदेवराईतील गांगो मंदिराच्या नुकसानीचा पंचनामा करा

राजापूर ःदेवराईतील गांगो मंदिराच्या नुकसानीचा पंचनामा करा

sakal_logo
By

-rat28p28.jpg
32390
राजापूर ः तालुक्यातील डोंगर देवराई येथील श्री देव गांगो मंदिरावर वृक्ष कोसळल्याने असे नुकसान झाले आहे.
-------------
देवराईतील गांगो मंदिराच्या
नुकसानीचा पंचनामा करा
राजापूर, ता. २८ ः तालुक्यातील डोंगर गावातील देवराई येथील श्री देव गांगो मंदिरावर या ठिकाणी वृक्ष कोसळून मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी डोंगरचे माजी सरपंच दीपक शेलार यांनी केली आहे. याचे एक लेखी निवेदन शेलार यांनी तहसीलदारांना दिले आहे.
वादळी वारा व पावसामुळे या ठिकाणी देवराई येथे असलेल्या गांगो मंदिरावर हा वृक्ष कोसळून पडला आहे. यात मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. देवराई ही शासकीय जागा आहे. तरी या ठिकाणी पाहणी करून पंचनामा करावा तसेच मंदिर हे शासकीय जागेत असले तरी ते सार्वजनिक असून, त्या मंदिराच्या पुनर्बांधणीला ग्रामस्थांना परवानगी द्यावी, अशी मागणी शेलार यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72361 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top