रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

किरकोळ कारणातून मायलेकाला शिवीगाळ
रत्नागिरी, ता. २८ : मेजर टेप न दिल्याच्या कारणातून माय-लेकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. २७) दुपारी साडे अकराला कोकणनगर येथे घडली. या प्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शफीउल्ला सोलकर, शेहनाज सोलकर, साहिल सोलकर (सर्व रा. कोकणनगर, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फिरोज रफिक सुभेदार (४७, रा. कोकणनगर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी (ता. २७) दुपारी संशयितांनी सुभेदार यांच्या घराच्या पुढील दरवाजावर लाथ मारून घरात प्रवेश केला. त्यानंतर माय-लेकाला शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलिस नाईक करळकर करत आहेत.
---------
जुगार अड्ड्यावर छापा; साडेसहा
लाखाचा मुद्देमाल केला जप्त
रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथील लघुउद्योग परिसरात सोमवारी (ता. २७) सायंकाळी जुगारअड्ड्यावर शहर पोलिसांनी धाड टाकली. त्यात रोख रक्कम, दोन कार आणि मोबाईल आणि इतर साहित्य असे एकूण ६ लाख ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धाडीत श्री. घोसाळे (४२, रा. आंबेशेत, रत्नागिरी), राजेश कोळेकर (४३, मारुती मंदिर, रत्नागिरी), प्रशांत महाजन (४९, कुवारबाव, रत्नागिरी ), अमोल शेट्ये (२६, नाचणे, रत्नागिरी), दयानंद गुरव (२८, मारुती मंदिर, रत्नागिरी), देवानंद सुर्वे (झाडगाव, रत्नागिरी) या ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार विनोद भितळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यातील संशयित झाडगाव लघुउद्योग परिसरात गैरकायदा जुगार अड्डा चालवून तीन पत्ती खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72369 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top