
रत्नागिरी ःखंडाळ्याजवळ एसटी चरात रुतली
-rat28p33.jpg
32415
-रत्नागिरी- तालुक्यातील खंडळा येथे रस्त्याशेजारील चरात रुतलेली एसटी.
---------------
खंडाळ्याजवळ एसटी चरात रुतली
रत्नागिरी, ता. २८ ः रत्नागिरी- कळझोंडीमार्गे व्हाया पन्हळी ते सैतवडे, अशा जाणाऱ्या एसटीला सोमवारी (ता. २७) दुपारी अपघात झाला. पाणीयोजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदलेल्या चरामध्ये एसटी रुतल्याने हा अपघात झाला. सुदैवाने, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
एसटी नेहमीप्रमाणे ही मार्गस्थ होऊन सैतवडेवरून सकाळी सव्वानऊ वाजता सुटली. खंडाळा पोलिसचौकीच्या जवळच दुसऱ्या वाहनाला बाजू देताना पाइपलाइनच्या चरीत चाक जाऊन रुतली. खंडाळा ते गुरव स्टॉपपर्यंत पाण्याच्या पाइपलाइनचे काम करण्यात आले आहे. हे काम करताना काही ठिकाणी ठेकेदाराने रस्त्याच्या साईडपट्टीवर चरी मारून हे काम केले. खंडाळा ते सैतवडे हा रस्ता धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात बाजू देणे किंवा बाजू देऊन पुढे जाणे धोक्याचे बनले आहे. रस्त्याची चाळण झाली आहे. ५ वर्षे झाली पण सैतवडे -खंडाळा रस्ता आहे, तसा आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. अवजड वाहनांना बाजू देऊन पुढे जाणे कठीण असल्याने हे अपघात वाढत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72394 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..