
पतीकडून पत्नीसह मुलींना मारहाण
पतीकडून पत्नीसह मुलींना मारहाण
ओरोसमधील प्रकार ः सिंधुदुर्गनगरी पोलिसांत गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ः पत्नीसह दोन लहान मुलींना मारहाण केल्याचा प्रकार ओरोस-खर्येवाडी येथे सोमवारी (ता.२७) रात्री ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. याबाबतची तक्रार पत्नी स्वाती दळवी (वय ४०) यांनी पती प्रवीण सुभाष दळवी (वय ४०) यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात हा दखलपात्र गुन्हा दाखल झाला असून प्रवीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित व तक्रारदार या दोन्ही कुडाळ तालुक्यातील आंब्रड दळवी टेंबवाडी येथील मूळ रहिवासी असून सध्या ते ओरोस खर्येवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा हॉटेलं व्यवसाय आहे. याबाबत पत्नी स्वाती हिने आज सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी प्रवीण व आपण नात्याने पती -पत्नी आहोत. सोमवारी रात्री ८ ते ९ या वेळेत ओरोस खर्येवाडी येथे राहत असलेल्या घरात पती प्रवीण यांनी आपल्याला व आपल्या दोन्ही मुलींना मारहाण केली. तसेच आजही सकाळी मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अधिक तपास पोलीस नागरगोजे हे करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72449 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..