
राजापूर ःपरिवर्तन ही विकासाची नांदी
-rat28p12.jpg
32489
राजापूर ः ''दक्षिण कोकणातील धम्मदीक्षित बौद्धामधील परिवर्तन'' या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करताना मनोहर खापणे, चंद्रकांत लिंगायत, डॉ. पी. एस. मेश्राम, प्रा. विकास पाटील.
--------------
मेश्राम यांचा ग्रंथ संशोधकांना मार्गदर्शक : खापणे
''दक्षिण कोकणातील धम्मदीक्षित बौद्धामधील परिवर्तन’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः ''परिवर्तनवाद्यांच्या वाट्याला संघर्ष अटळ असतो. परिवर्तन ही विकासाची नांदी असून, परिवर्तनाचा हा विचार एका दिवसात रुजत नाही तर तो संघर्षाने रुजवावा लागतो. कोकणातील धम्मदीक्षित बौद्धांनाही संघर्ष करावा लागला. त्यानंतरच त्यांच्यात परिवर्तनाचा विचार रुजला. त्यांच्यामधील या परिवर्तनाचा अभ्यास करून त्याच्यावर प्रकाशझोत टाकणारे ''दक्षिण कोकणातील धम्मदीक्षित बौद्धामधील परिवर्तन'' हा डॉ. पी. एस. मेश्राम यांनी लिहिलेला ग्रंथ निश्चितच संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक मनोहर खापणे यांनी केले.
''दक्षिण कोकणातील धम्मदीक्षित बौद्धामधील परिवर्तन'' या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
श्री मनोहर हरि खापणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी ''दक्षिण कोकणातील धम्मदीक्षित बौद्धामधील परिवर्तन'' हा ग्रंथ लिहिला असून, त्याच्या द्वितीय आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. या वेळी संस्था सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत, डॉ. मेश्राम आदी उपस्थित होते. खापणे यांनी डॉ. मेश्राम यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण ग्रंथाचे कौतुक करताना या ग्रंथाच्या लेखनासह संशोधनासाठी त्यांनी घेतलेले कष्ट निश्चितच कौतुकास्पद आहेत. याप्रसंगी मुंबई विद्यापीठ आणि राजस्थान येथील जे. जे. टी. विद्यापीठ यांची गाईडशिप, आयसीएसएसआरचा संशोधन प्रकल्प आणि महात्मा फुले इमिनंट नॅशनल अवॉर्ड (राष्ट्रीय पुरस्कार) २०२२-२३ साठी निवड झाल्याबद्दल डॉ. पी. एस. मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला.
---------
चौकट
अभ्यासक्रमांमध्ये संदर्भग्रंथ म्हणून समावेश
डॉ. मेश्राम यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या ''दक्षिण कोकणातील धम्मदीक्षित बौद्धामधील परिवर्तन'' या पुस्तकाचा नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72452 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..