कणकवली : पदवीदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : पदवीदान
कणकवली : पदवीदान

कणकवली : पदवीदान

sakal_logo
By

32520
फोंडाघाट ः येथे उद्योजक अनिल नेवाळकर यांचा सत्कार करताना संस्थेचे पदाधिकारी.

यशासाठी वास्तवाचे भान ठेवा

अनिल नेवाळकर ः फोंडाघाट महाविद्यालयात पदवीदान

फोंडाघाट, ता. २ ः ‘‘मी कुठे आहे आणि मला काय करायचे आहे, याची स्पष्टता असली की यश मिळवणे सोपे जाते. विद्यार्थ्यांना भविष्याचा प्रश्न पडतो. मार्गदर्शनासाठी ते येतात. त्यावेळी ते कुठे आहेत, हेच त्यांना माहीत नसते. त्यामुळे ध्येयासाठी वास्तवाचे भान ठेवा,’’ असा सल्ला उद्योजक अनिल नेवाळकर यांनी दिला.
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभात ते बोलत होते. संस्थाध्यक्ष सुभाष सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संदेश पटेल म्हणाले की, तरुणांनी तरुणाईची जाण ठेवून प्रगती केली पाहिजे. स्वतःला घडवताना समाजही घडत असतो, याचे भान ठेवले पाहिजे. पाल्यावरील चुकीच्या संस्कारांमुळे समाज बिघडतो. संस्थेचे सचिव चंद्रशेखर लिंगस म्हणाले की, नेवाळकर हे १९७० च्या दशकापासून उद्योग क्षेत्रात आहेत. त्यांच्या व्यावसायिक शिस्तबद्धतेचा आदर्श घ्या. प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. डॉ. सतीश कामत यांनी महाविद्यालयाच्या चढत्या आलेखाचा आढावा घेतला. डॉ. बालाजी सुरवसे यांनी परिचय केला. डॉ. संतोष रायबोले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी. बी. ताडेराव यांनी आभार मानले.
--
‘उद्योजक बना’
नेवाळकर म्हणाले की, राजकारणापासून दूर ठेवून वडिलांनी मला उद्योजक केले. तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी स्वतःला घडवले पाहिजे. जग तंत्रज्ञानामुळे फार वेगाने बदलत आहे. नवा उद्योग सुरू करण्याची नोकरी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे उपक्रम कौतुकास्पद आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y72554 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..